Sun, Sep 20, 2020 02:50होमपेज › Mumbai-Thane-Raigad › पेट्रोल- डिझेल आणखी स्वस्त; जाणून घ्या आजचे दर

पेट्रोल- डिझेल आणखी स्वस्त; जाणून घ्या आजचे दर

Last Updated: Sep 17 2020 12:29PM

file photoनवी दिल्ली : पुढारी वृत्तसेवा

सार्वजनिक क्षेत्रातील तेल कंपन्यांकडून गुरुवारी पेट्रोल दरात 13 ते 15 पैशांची तर डिझेल दरात 18 ते 20 पैशांची कपात करण्यात आली. ताज्या कपातीनंतर देशाची राजधानी दिल्लीत पेट्रोलचे लिटरचे दर 72.37 रुपयांपर्यंत खाली आले असून डिझेलचे लिटरचे दर 81.40 रुपयांपर्यंत खाली आले आहेत. 

वाचा : 'जया बच्चन ड्रग्ज प्रकरणाचं राजकारण करताहेत'

कोलकाता येथे पेट्रोल व डिझेलचे दर अनुक्रमे 75.87 आणि 82.92 रुपयांपर्यंत खाली आले आहेत. मुंबईमध्ये हेच दर अनुक्रमे 78.85 व 88.07 रुपयांपर्यंत खाली उतरले आहेत. चेन्नई येथे पेट्रोलचे दर 77.73 आणि डिझेलचे दर 84.44 रुपयांवर आले आहेत.

वाचा : संजय राऊत म्हणाले, 'क्या लोग भाभीजी के पापड खाके कोरोनासे ठीक हो गए?

 "