Tue, May 26, 2020 15:34होमपेज › Mumbai-Thane-Raigad › NPR, NRC विरोधात विधीमंडळात ठराव करावा, महिलांचे पवारांना साकडे 

NPR, NRC विरोधात विधीमंडळात ठराव करावा, महिलांचे पवारांना साकडे 

Last Updated: Feb 18 2020 10:21AM
मुंबई : पुढारी ऑनलाईन 

राज्य सरकाने महाराष्ट्रात एनपीआर आणि एनआरसी विरोधात विधीमंडळ आधिवेशनात ठरवा करावा अशी मागणी  महाराष्ट्रातील विविध महिला संघटनांनी केली आहे. या महिला संघचनांच्या प्रतिनिधींनी आज (दि.18) राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि खासदार शरद पवार यांच्याकडे केली. यावेळी विविध क्षेत्रातील महिलांनी या प्रक्रियेचा सर्वसामान्यांना कसा फटका बसणार आहे याची मांडणी केली. या बैठकीला शरद पवारांबरोबरच खासदार सुप्रिया सुळे आणि कॅबिनेट मंत्री जितेंद्र आव्हाडही उपस्थित होते. 

एनपीआर आणि एनआरसी विरोधात महाराष्ट्र सरकारने ठराव करावा ही मागणी घेऊन महाराष्ट्रातील विविध महिला संघटनांनी महाविकास आघाडीचे सरकार मुर्त स्वरुपात आणणाऱ्या शरद पवारांची भेट घेतली. या भेटीनंतर शरद पवारांनी आघाडी सरकारने याच्यावर निर्णय घ्यावा यासाठी प्रयत्न करत आहे, चर्चा सुरु आहे असे सांगितले. याचबरोबर महिला संघना आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची बैठक व्हावी यासाठी ते स्वतः प्रयत्न करणार असे आश्वासनही त्यांनी महिला प्रतिनिधींना दिली.  

पवारांनी एनआरसी आणि एनपीआर विरोधात सनदशीर मार्गेने आंदोलन करणाऱ्या लोकांवर आणि कार्यकर्त्यांवर पोलिस दडपशाही करणार नाहीत याची काळजी घेऊ असेही यावेळी सांगितले.