Tue, May 26, 2020 15:02होमपेज › Mumbai-Thane-Raigad › 'महाविकास अघाडीतील तिन्ही पक्षांना सुसंवादाची गरज'

'महाविकास अघाडीतील तिन्ही पक्षांना सुसंवादाची गरज'

Last Updated: Feb 24 2020 1:27AM
मुंबई : पुढारी ऑनलाईन 

महाविकास आघाडीतील शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसमध्ये संवादाचा अभाव आहे. प्रथम त्या तिन्ही पक्षांनी आपआपसात सुसंवाद साधावा मग विरोधी पक्षाला चहाचे आमंत्रण द्यावे अशी बोचरी टीका विरोधी पक्ष नेते देंवेंद्र फडणवीस यांनी केली. उद्यापासून (दि.२४) अर्थसंकल्‍पीय अधिवशन सुरू होत आहे. या पार्श्वभूमीवर भाजपच्या पत्रकार परिषदेत फडणवीस बोलत होते. 

फडणवीस म्हणाले की, कर्जमाफीच्‍या मुद्यावर महाविकास आघाडीचे सरकार शेतक-यांची फसवणूक करत आहे. कर्जमाफी नाही आणि कर्जमुक्‍तीही नाही. या नव्या सरकारने एकही आश्‍वासन पूर्ण केलेले नाही. आतातर्यंत नवीन सरकारला सूर गवसलेला नाही, असा जोरदार हल्लाबोल केला.