Fri, Oct 30, 2020 07:56होमपेज › Mumbai-Thane-Raigad › ठाणे : केवळ इमारतीचा मजला होणार सील, पालिकेचा नवा अध्यादेश

ठाणे : केवळ इमारतीचा मजला होणार सील, पालिकेचा नवा अध्यादेश

Last Updated: May 23 2020 1:31PM

संग्रहित छायाचित्रठाणे : पुढारी वृत्तसेवा

एखाद्या इमारतीमध्ये कोरोना बाधित रुग्ण सापडल्यानंतर ती संपूर्ण इमारतच सील करण्याबरोबरच ५०० मीटर पर्यंतचा परिसर देखील सील केला जात होता. मात्र अत्यावश्यक सेवेत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची यामुळे मोठी गैरसोय निर्माण होत असल्याने आता ज्या इमारतीच्या मजल्यावर कोरोना बाधित रुग्ण सापडला आहे. केवळ तेवढाच मजला सील करण्याचा नवा अध्यादेश ठाणे महापालिकेच्या वतीने काढण्यात आला आहे. झोपडपट्टी बाबत मात्र अद्याप कोणत्याही प्रकारचे काढण्यात आलेले नाहीत.

वाचा : कलाकार, कामगारांना 'धकधक गर्ल'चा मदतीचा हात 

ठाणे शहराने कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येत आता पुणे शहराला देखील मागे टाकले असून, शुक्रवारी दिवसभरात तब्बल १९७ नवे कोरोना रुग्ण सापडले आहेत. आतापर्यंतचा हा सर्वात उच्चांक आहे. विशेष करून आता झोपडपट्टी भागात हे प्रमाण वाढले असल्याने ठाण्याची चिंता अधिक वाढली आहे. त्यामुळे झोपडपट्टी भागातील कोरोनाचा संसर्ग कसा आटोक्यात आणायचा असा मोठा प्रश्न प्रशासनासमोर निर्माण झाला आहे.

झोपडपट्टीत हा प्रश्न गंभीर झाला असला तरी इमारतींमध्येही कोरोना रुग्ण सापडण्याचे प्रमाण कमी झालेले नाही. त्यामुळे ठाणे  शहरात मोठ्या प्रमाणात कंटेन्मेंट झोन तयार करण्यात आले असून, यामध्ये अनेक इमारातींचा समावेश करण्यात आला आहे.अनेक इमारातींमध्ये अत्यावश्यक सेवेत काम करणारे पोलिस, नर्स आणि इतर कर्मचारी असल्याने इमारत सील केल्यानंतर त्यांना बाहेर पडता येत नसल्याने नागरिकांना देखील मदत करण्यास अडचणी निर्माण होत आहेत. त्यामुळे आता ठाणे महापालिकेच्या वतीने नवा अद्यादेश काढण्यात आला आहे. यामध्ये इमारतीच्या ज्या मजल्यावर रुग्ण सापडला असेल तोच मजला सील करण्यात येणार आहे. सोसायटीच्या इतर सदस्यांनी मात्र सोशल डिस्टनसिंगच पालन करायचे असे पालिकेचे अतिरिक्त आयुक्त गणेश देशमुख यांनी आपल्या अद्यादेशात नमूद केले आहे.

वाचा :‘राज्यपाल आणि मुख्यमंत्री यांच्यातील संबंध अत्यंत मधुर’

 "