Fri, Jul 03, 2020 03:57होमपेज › Mumbai-Thane-Raigad › राज्यात साडेसहा लाख तळीरामांना घरपोच मद्य

राज्यात साडेसहा लाख तळीरामांना घरपोच मद्य

Last Updated: May 31 2020 9:58PM

संग्रहित छायाचित्रमुंबई : पुढारी वृत्तसेवा 

राज्यात १५ मे पासून सुमारे ६ लाख ६८ हजार ६४५ तळीरामांनी ऑनलाइनद्वारे आपल्या घरपोच मद्य मागवले. रविवारी राज्यभरात ६३ हजार ९६२ तर मुंबई शहर आणि उपनगरात ४१ हजार ५३४ ग्राहकांनी या सेवेचा लाभ घेतला.

वाचा : रेल्वे वाहतूक रूळावर, सोमवारपासून धावणार २०० ट्रेन

राज्यात गडचिरोली, वर्धा, चंद्रपूर, सोलापूर व औरंगाबाद वगळता ३१ जिल्ह्यांमध्ये मद्य विक्री सुरू आहे. १० हजार ७९१ परवानाधारक दुकानापैकी सध्या ७ हजार २०७ दुकानांमधून ऑनलाइनद्वारे मद्य विक्री सुरू आहे.

वाईन शॉपसमोरील गर्दी टाळण्यासाठी ऑनलाइनद्वारे घरपोच सेवा सुरू केल्यानंतर राज्यातील अनेक ग्राहकांकडे केल्या नंतर राज्यातील अनेक ग्राहकांकडे मद्य पिण्याचा परवाना नव्हता. १ ते ३० मे २०२० या कालावधीत सुमारे १ लाख १८ हजार ९५१ व्यक्तींनी मद्यसेवन परवाने मिळवण्यासाठी अर्ज केले. त्यापैकी १ लाख ८ हजार ०८५ व्यक्तींना परवाने मंजूर करण्यात आले आहेत. उर्वरित अर्जावर कारवाई चालू आहे.

कोणाला ऑनलाइन परवाना घ्यायचा नसेल तर त्यांना उत्पादन शुल्क विभागाच्या सर्व कार्यालयात दररोज ऑफलाइन पद्धतीने उपलब्ध केले आहेत. राज्य उत्पादन शुल्क विभागाने ३० मे रोजी राज्यात १७३ गुन्हे नोंदविले असून, ५१ आरोपींना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून ३४ लाख  रुपये किमतीचा ऐवज जप्त केला आहे. 

वाचा : ७ जूनपासून वृत्तपत्र घरपोच मिळणार : मुख्यमंत्री ठाकरे (video)