Tue, May 26, 2020 14:28होमपेज › Mumbai-Thane-Raigad › धोक्याची घंटा!; आशियातील सर्वात मोठी झोपडपट्टी धारावीत कोरोनाचा रुग्ण

धोक्याची घंटा!; आशियातील सर्वात मोठी झोपडपट्टी धारावीत कोरोनाचा रुग्ण

Last Updated: Apr 01 2020 9:27PM

file photoमुंबई : पुढारी वृत्तसेवा

आतापर्यंत फक्त श्रीमंतामध्ये आढळलेला कोरोना आता राज्यातील गरीब व्यक्तींपर्यंत पोहोचण्यास सुरुवात झाली आहे. कोरोना विषाणूने आशिया खंडातील सर्वात मोठी झोपडपट्टी असलेल्या मुंबईतील धारावी झोपडपट्टीमध्ये शिरकाव केला आहे. येथे कोरोनाचा पहिला रुग्ण आढळून आला आहे.

वाचा : राज्यात ३३ नवीन कोरोना रुग्ण; बाधितांची संख्या ३३५ 

हा रुग्ण ५६ वर्षांचा असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. त्याच्या कुटुंबातील ८ ते १० जणांना क्वारंटाईन करण्यात आलं आहे. ज्या इमारतीत हा रूग्ण राहत आहे त्या इमारतीला सील करण्यात आलं आहे.

 वाचा : बारामती : लॉकडाऊनचे उल्लंघन; झाली तीन दिवस कैदेची शिक्षा

धारावीत १५ लाख लोकं राहतात. धारावी हे ६१३ हेक्टर क्षेत्रावर पसरले आहे. धारावीमध्ये लाखो मजुरी करणारे आणि छोटे व्यापारी राहतात.

राज्यात बुधवारी कोरोना बाधित ३३ नवीन रुग्णांची नोंद झाली. यातील ३० रुग्ण मुंबईचे, पुणे येथील २ तर बुलडाण्याच्या एका रुग्णाचा समावेश आहे. यामुळे राज्यातील एकूण बाधित रुग्णांची संख्या ३३५ झाली आहे.

वाचा : 'तबलिगी'च्या मेळाव्यातील पुणे विभागातील १८३ जणांची यादी प्राप्त

महाराष्ट्रात कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढत आहे. आतापर्यंत फक्त बाहेरुन येणाऱ्या लोकांना कोरोना झाला होता. पण आता तो येथील सामान्य माणसापर्यंत पोहोचला आहे. त्यामुळे भारतासाठी ही धोक्याची घंटा आहे.