Fri, Nov 27, 2020 23:16होमपेज › Mumbai-Thane-Raigad › महिलांवरील लैंगिक अत्याचाराचे पॉर्न व्हिडिओ बनवून केले व्हायरल; नराधमाला अटक

महिलांवरील लैंगिक अत्याचाराचे पॉर्न व्हिडिओ बनवून केले व्हायरल; नराधमाला अटक

Last Updated: Nov 01 2020 1:02AM

संग्रहित फाेटाेविक्रमगड (जि. पालघर) : पुढारी वृत्तसेवा

एका महिन्याभरापूर्वी पालघर जिल्ह्यातील विक्रमगड तालुक्यातील मिलिंद झडे तरुणाचे एका मुलीबरोबरचे अश्लील व्हिडिओ सोशल मीडियावर पसरले. त्याबाबत सदर पीडितेने विक्रमगड पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. त्यांनतर त्याच्यावर वालीव पोलिस ठाण्यात देखील तक्रार दाखल करण्यात आली होती. मात्र अनिल झडे हा आरोपी पोलिसांच्या हातावर तुरी देत जंगलात लपून बसला होता. मात्र त्या आरोपीला अखेर पोलिसांनी ताब्यात घेतले.

विक्रमगड तालुक्यातील पाचोडे या गावातील मिलिंद अनिल झडे (वय ३२) या इसमाने काही महिन्यांपूर्वी महिलांना फूस लावून त्यांच्यावर लैंगिक अत्याचार करून त्याचे व्हिडिओ काढत ते सोशल मिडियावर टाकले होते. त्यांनतर ही बाब एका लक्षात आल्यानंतर त्याच्यावर विक्रमगड तसेच वालीव पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले होते. मात्र गुन्हा दाखल झाल्याचे समजतात मिलिंद झडे याने घरातून पळ काढला. तो जव्हार व विक्रमगड तालुक्यात असलेल्या डोंगरी व जंगल भागात लपून बसला होता. त्यांनतर स्थानिक गुन्हे शाखेच्या बोईसर युनिटचे सहाय्यक पोलिस निरीक्षक भीमसेन गायकवाड यांनी एक पथक तयार करून आरोपीचा कसोशीने शोध घ्यायला सुरुवात केली. त्याच अनुषंगाने आरोपी मिलिंद झडे हा पचमाड येथे येणार असल्याची खात्रीशीर माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून त्याला पचमाड नाका येथे पकडून ताब्यात घेतले.

अनिल झडेवर विक्रमगड पोलिस ठाण्यात भादंविसंक प्रमाणे 376(एन) (2), 452, 506 व माहिती तंत्रज्ञान अधिनियम कलम 67 तसेच वालीव पोलिस ठाण्यात भादविसंक प्रमाणे 376(एन) (2), 506 हे गुन्हे नोंद आहेत. 

महिलांवर अत्याचार करून त्याचे व्हिडिओ बनवून सोशल मीडियावर टाकणाऱ्या या झडेला पकडण्यास पालघरचे पोलिस अधीक्षक दत्तात्रेय शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक भीमसेन गायकवाड, पोलिस हवालदार दिपक राऊत, संदीप सरदार, संदीप सूर्यवंशी पोलिस नाईक, नरेंद्र पाटील यांनी आपली कामगिरी चोख बजावली आहे.