Fri, Jul 03, 2020 04:42होमपेज › Mumbai-Thane-Raigad › पदवीच्या अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांना ठाकरे सरकारचा दिलासा

पदवीच्या अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांना ठाकरे सरकारचा दिलासा

Last Updated: May 31 2020 10:33PM

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेमुंबई : पुढारी ऑनलाईन

लॉकडाऊन हा शब्द अंगवळणी पडला आहे. या काळात जन्माला आलेल्या नवजात मुलांच्या कानावर आईपेक्षा जास्त लॉकडाऊन हाच शब्द पडत आहे. सध्याच्या परिस्थितीत विद्यापीठाच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा घेणे शक्य नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांना कॉलेजमध्ये झालेल्या सेमिस्टर परीक्षांच्या आधारावर पास करण्यात येईल अशी घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे. फेसबुकच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधला.

कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे विद्यापीठाच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा तातडीने घेणे शक्य नाही. करीअरच्या महत्वाच्या टप्प्यांवर विद्यार्थ्यांना ताटकळत ठेवणे योग्य नाही. त्यामुळे सेमिस्टर परीक्षांमधील गुणांची सरासरी काढून विद्यार्थ्यांना पास करण्यात येईल. परीक्षा घेण्याबद्दल कुलगुरुंची मते जाणून घेतली आहेत. सध्याच्या परिस्थितीत तातडीने परीक्षा घेणे शक्य नाही. आमच्यातला पालक आजही जिवंत आहे. त्यामुळे अंतिम वर्षाच्या परीक्षा घेण्याऐवजी आतापर्यंत झालेल्या सेमिस्टरमधील सरासरीच्या आधारावर पास करण्यात येईल” असेही उद्धव ठाकरे म्हटले.

वाचा :राज्यात साडेसहा लाख तळीरामांना घरपोच मद्य