Tue, Sep 22, 2020 10:36होमपेज › Mumbai-Thane-Raigad › पेट्रोल- डिझेलनंतर आता गॅस सिलिंडर महागला; जाणून घ्या नवे दर!

पेट्रोल- डिझेलनंतर आता गॅस सिलिंडर महागला; जाणून घ्या नवे दर!

Last Updated: Jul 01 2020 1:22PM

file photoनवी दिल्ली : पुढारी वृत्तसेवा

सार्वजनिक क्षेत्रातील तेल कंपन्याकडून बुधवारी विमानाचे इंधन (एटीएफ) तसेच विनाअनुदानित घरगुती गॅस दरात वाढ करण्यात आली. एटीएफ दरात गेल्या महिनाभरात झालेली ही तिसरी वाढ आहे. एटीएफ दरात आज साडेसात टक्क्यांची वाढ करण्यात आली आहे. विशेष म्हणजे तेल कंपन्याकडून सलग दुसऱ्या दिवशी पेट्रोल आणि डिझेल दरात वाढ करण्यात आलेली नाही. 

वाचा : आजपासून बदलले 'हे' नियम, सर्वसामान्यांच्या खिशावर होणार परिणाम 

तेल कंपन्याकडून विनाअनुदानित घरगुती गॅस सिलिंडर दरातही वाढ करण्यात आली आहे. दिल्लीतील गॅस सिलिंडरचे दर एक रुपयाने वाढून 594 रुपयांवर गेले आहेत. दुसरीकडे मुंबईतील गॅस सिलिंडरचे दर 3.5 रुपयांनी वाढले आहेत. जून महिन्यात गॅस सिलिंडरचे दर 11.50 रुपयांनी वाढविण्यात आले होते. कोलकाता येथील सिलिंडरचे दर 4.5 रुपयांनी वाढून 620.50 रुपयांवर गेले आहेत. चेन्नई येथील दर चार रुपयांनी वाढून 610.50 रुपयांवर गेले आहेत. 

वाचा : मेथीची भाजी समजून खाल्ला गांजा 

तेल कंपन्यानी एटीएफ दरात प्रतिकिलो लिटरमागे 7.48 टक्क्यांनी म्हणजे 2922.94 रुपयांनी वाढ केली आहे. ताज्या दरवाढीनंतर एटीएफचे दर 41 हजार 993 रुपयांवर गेले आहेत. 1 जून रोजी एटीएफ दरात तब्बल 56.6 टक्क्यांची म्हणजे 12 हजार 127 रुपयांची वाढ करण्यात आली होती. त्यानंतर 16 जून रोजी 5495 रुपयांची वाढ करण्यात आली होती. 

 "