Mon, Sep 28, 2020 15:20



होमपेज › Mumbai-Thane-Raigad › नितीन गडकरींकडून टोलला तात्पूरती स्थगिती

नितीन गडकरींकडून टोलला तात्पूरती स्थगिती

Last Updated: Mar 26 2020 10:42AM

संग्रहित छायाचित्र



मुंबई : पुढारी ऑनलाईन 

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी मोठा निर्णय घेतला असून देशातील अनेक टोलनाक्यांवर वसुली बंद करण्यात आली आहे. परंतु, अनेक टोलनाक्यांवर वसुली सुरूच आहे. तर काही टोलनाक्यांवर वसुली बंद झाली आहे. 

देशभरात पुढील काही दिवस टोल वसुली बंद करण्यात येणार आहे. वाशी, मुलूंड टोलनाक्यावर अद्याप वसुली सुरू आहे. वरून आदेश आल्यानंतरच वसुली बंद करू असे त्यांच्याकडून प्रसारमाध्यमांना सांगण्यात आले. केंद्राकडून टोल वसुली बंद झाली आहे. राज्याकडून टोल वसुली कधी बंद होणार? असा सवाल विचारला जात आहे. 
 





 







"