Thu, Sep 24, 2020 17:42होमपेज › Mumbai-Thane-Raigad › नया है वह...! पार्थ पवारांवर छगन भुजबळांची प्रतिक्रिया

नया है वह...! पार्थ पवारांवर छगन भुजबळांची प्रतिक्रिया

Last Updated: Aug 13 2020 1:20PM

छगन भुजबळ आणि पार्थ पवारमुंबई : पुढारी ऑनलाईन

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांनी अभिनेता सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणी सीबीआय चौकशीची मागणी केली होती. मात्र, त्यांचे आजोबा आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी काल पार्थ यांच्या सीबीआय मागणीतील हवाच काढून टाकली होती. माझ्या नातवाच्या मागणीला कवडीची किंमत देत नाही, तो अपरिपक्व आहे, अशी प्रतिक्रिया शरद पवार यांनी दिली होती. आता या मुद्यावरुन राष्ट्रवादीचे काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी आपले मत व्यक्त केले आहे. 

अजित पवार दुखावलेले नाही. पवार कुटुंबात कसलेही वाद नाहीत, पवार साहेबांनी तसे सांगितले आहे. पॉर्थ अपरिपक्व असल्याचे ते बोलले आहेत. हिंदीत त्याला 'नया है वह...' असे म्हणतात, अशी प्रतिक्रिया देत भुजबळ यांनी टोला लगावला आहे.

सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाची सीबीआयकडून चौकशी व्हावी अशी मागणी पार्थ पवार यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांची भेट घेत केली होती. यावरुन राजकारण तापलं आहे. 

 "