Sun, Oct 25, 2020 07:33होमपेज › Mumbai-Thane-Raigad › पवारांचा दानवेंना तीनवेळा फोन आणि त्यानंतर घेतली प्रत्यक्षात भेट!

पवारांचा दानवेंना तीनवेळा फोन आणि त्यानंतर घेतली प्रत्यक्षात भेट!

Last Updated: Sep 18 2020 12:16PM

शरद पवार आणि रावसाहेब दानवे 

 

 

नवी दिल्ली : पुढारी ऑनलाईन

कांदा निर्यात बंदीविरोधात महाराष्ट्रात शेतकऱ्यांची आंदोलने सुरु आहेत. या पार्श्वभूमीवर केंद्रीय अन्न व नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि शिवसेना खासदार संजय राऊत यांची भेट घेतली. त्यांच्या या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.

वाचा : ऊर्जामंत्री नितीन राऊत कोरोना पॉझिटिव्ह

मात्र, दानवे यांनी शरद पवारांच्या भेटीमागचा उद्देश स्पष्ट केला आहे. साखर कारखाने आणि कांदा प्रश्नी शरद पवारांसोबत चर्चा केल्याचे दानवे यांनी म्हटले. महाराष्ट्रात साखर कारखान्यांचा प्रश्न आहे. कारखाने सुरु करण्यासाठी बँका पैसे द्यायला तयार नाहीत. याबाबत राज्य सरकारने काय केले पाहिजे. यावर पवारांशी चर्चा केली, असे दानवे यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितले.

राज्यातील कांदा उत्पादकांना न्याय मिळाला पाहिजे. यासाठी मंगळवारनंतर पंतप्रधानांना भेटणार आहे. त्यासाठी वेळ मागितली आहे, असे ते म्हणाले. 

वाचा : शिवसेना बाहेर पडली तेव्हाच एनडीए झाली होती विस्कळीत : संजय राऊत 

शरद पवार हे ज्येष्ठ आणि जाणकार नेते आहे. त्यांच्या भेटीमागे राजकारण नाही. त्यांच्यासोबत मी अनेक वर्षे एकत्र काम केले आहे. साखरेच्या प्रश्नासंदर्भात पवारांचा तीन वेळा फोन आला होता, असा खुलासाही दानवे यांनी केला.

वाचा : आर्थिक अराजकतेला नोटाबंदीसारखे प्रयोग जबाबदार; शिवसेनेची मोदी सरकारवर टिका 

दरम्यान, दानवे यांनी संजय राऊतांची देखील भेट घेतली. संजय राऊत आणि आपण युतीमध्ये एकत्र होतो. त्यांच्याशी महाराष्ट्राबद्दल काही चर्चा झाली नाही. फक्त त्यांच्यासोबत चहापान केला. राज्यातील कोरोनाबाबत काळजी घ्यायला पाहिजे. राज्यातील स्थिती पूर्वपदावर आणण्यासाठी सर्वांनी एकत्र यायला हवे, असेही आवाहन दानवे यांनी केले. 

 

 "