Thu, Sep 24, 2020 10:35होमपेज › Mumbai-Thane-Raigad › अशोक चव्हाणांची बोलण्याची पद्धत चुकली : नवाब मलिक

अशोक चव्हाणांची बोलण्याची पद्धत चुकली : नवाब मलिक

Last Updated: Jan 28 2020 12:06PM

अशोक चव्हाणांची बोलण्याची पद्धत चुकलीः नवाब मलिकमुंबई : पुढारी ऑनलाईन 

काँग्रेस नेते आणि राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांच्या वक्तव्यानंतर महाराष्ट्र विकास आघाडीमध्ये नाराजी असल्याची माहिती समोर येत आहे. संविधानाच्या उद्देशिकेबाहेर काम करणार नाही हे शिवसेनेकडून लिहून घ्या, असे सोनिया गांधी यांनी सांगितल्याचं अशोक चव्हाण यांनी नांदेडमधील एका कार्यक्रमात म्हणाले होते. त्यांच्या या वक्तव्यावर नाराजी व्‍यक्‍त करत राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक म्‍हणाले की, अशोक चव्हाण यांची  बोलण्याची पद्धत चुकली आहे. 

राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना म्‍हटले आहे की, अशोक चव्हाण यांची बोलण्याची पद्धत चुकली आहे. केवळ शिवसेनेकडून लिहून घेतले नाही तर किमान समान कार्यक्रमावर शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी या तिन्ही पक्षांनी स्वाक्षऱ्या केल्या आहेत.

अशोक चव्हाण काय म्‍हणाले होते?

नांदेडमध्ये प्रजासत्ताक दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलताना अशोक चव्हाण यांनी सत्ता स्थापनेसंदर्भात गौप्यस्फोट केला होता. तीन पक्षांच्या सरकारला काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांचा विरोध होता. शिवसेनेने घटनेनुसार काम करावे, असे आम्ही त्यांच्याकडून लिहून घेतले आहे. जर शिवसेनेने घटनेनुसार काम केले नाही तर आम्ही सत्तेतून बाहेर पडू, असे वक्तव्य केले होते. 

 "