Wed, Dec 11, 2019 18:50होमपेज › Mumbai-Thane-Raigad › नवाब मलिकांचा भाजपवर पुन्हा निशाणा

नवाब मलिकांचा भाजपवर पुन्हा निशाणा

Last Updated: Dec 03 2019 10:38AM

नवाब मलिकमुंबई : पुढारी ऑनलाईन 

महाराष्ट्रात शिवसेनेच्या नेतृत्वाखाली काँग्रेस आणि राष्ट्रवादीने सरकार स्थापन केले आहे. सत्ता स्थापनेपूर्वी व सत्ता स्‍थापनेनंतरही महाविकास आघाडीच्या नेत्यांचे सोशल मीडियावर भाजप विरोधात शाब्‍दीक युद्ध सुरुच आहे. शेर, शायरी यांच्या माध्यमातून नवाब मलिक दररोज भाजपला लक्ष्य करत आहे. आजही त्यांनी एक शायरी ट्विट करत भाजपवर अप्रत्यक्षपणे शरसंधान साधले आहे.

''ये कैसी खामोसी है क्योँ थम गया वो शोर,वो भी एक दौर था हां ये भी है एक दौर ।'' अशी शायरी शेअर करत नवाब मलिक यांनी ट्विट केले आहे. यावरुन सुपरस्‍टार राजेश खन्‍ना यांचा आनंद चित्रपटातील डायलॉग आठवल्‍याशिवाय राहत नाही. त्‍याला जुळतीच शायरी नवाब मलिक यांनी शेअर करत भाजपच्‍या विरोधात षटकार मारला आहे. 

'बस एक ही ठोकर से गिर जाएँगी दीवारें… आहिस्ता ज़रा चलिए शीशे के मकानों में' … काल असा शेर ट्विट करत संजय राऊत यांना काहीसा संयम ठेवण्याचा सल्ला नवाब मलिक यांनी दिला होता. याबरोबरच त्यांनी भाजपला टोला लगावला होता. 

महाराष्ट्रात शिवसेनेच्या नेतृत्वाखाली काँग्रेस आणि राष्ट्रवादीने सरकार स्थापन केले आहे. सत्ता स्थापनेपूर्वी व सत्ता स्‍थापनेनंतरही राष्‍ट्रवादीचे नेते नवाब मलिक व शिवसेना नेते संजय राऊत यांचे सोशल मीडियाच्‍या भाजपवर निशाणा साधणे सुरुच आहे. संजय राऊत यांच्‍या ट्‍विटला नवाब मलिक यांचे फोडणी द्‍यायचे काम सुरुच आहे.