Thu, Sep 24, 2020 16:28होमपेज › Mumbai-Thane-Raigad › मुंबई : वाळकेश्वर येथे इमारतीच्‍या १७ व्‍या मजल्याला आग (व्‍हिडिओ)

मुंबई : वाळकेश्वर येथे इमारतीच्‍या १७ व्‍या मजल्याला आग (व्‍हिडिओ)

Published On: Dec 25 2017 6:14PM | Last Updated: Dec 25 2017 7:32PM

बुकमार्क करा

मुंबई : प्रतिनिधी

मुंबईमधील वाळकेश्वर परिसरातील लिजेंड इमारतीला सोमवारी सायंकाळी साडेचारच्या सुमारास आग लागली. या ३१ मजल्‍याच्‍या इमारतीच्या सतराव्या आणि अठराव्या मजल्यावरील ड्युप्लेक्स फ्लॅटला अचानक आग लागली. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी रवाना झाल्या.

बाणगंगा येथील राजभवन जवळच असलेल्या लिजेंट या इमारतीतील सतराव्या आणि अठराव्या मजल्यावर ही आग लागली. या इमारतीतील अनेक फ्लॅट हे सध्या रिकामेच आहेत. पण काही फ्लॅटमध्ये केअर टेकरही आहेत. त्यामुळे इमारतीत असणार्‍या लोकांना बाहेर काढण्याचे कामही अद्याप सुरु आहे. सध्या घटनास्थळी ४ फायर इंजिन, ३ जेट टँकर, 3 एच. पी. आणि रुग्णवाहिका पोहचल्या असून आग विझवण्याचे काम युद्धपातळीवर सुरु आहे. ही आग नेमकी कशामुळे लागली याबाबत मात्र कोणतीही माहिती अद्याप समजू शकलेली नाही.