Sat, May 30, 2020 00:42होमपेज › Mumbai-Thane-Raigad › मुंबई : कशेडी घाटात टँकरला अपघात 

मुंबई : कशेडी घाटात टँकरला अपघात 

Last Updated: Feb 27 2020 11:25AM

मुंबई : कशेडी घाटात टँकरला अपघात पोलादपूर ( मुंबई): पुढारी वृत्तसेवा

मुंबई-गोवा महामार्गावर कशेडी घाटात दोन टँकरमध्ये  धडक होऊन अपघात झाला. या अपघातात दोन्ही वाहनांचे नुकसान झाले आहे. मात्र सुदैवाने जीवितहानी टळली. ही  घटना गुरूवारी सकाळी  सव्वासातच्या सुमारास येलगेवाडीजवळ एका अवघड वळणावर घडली.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, चालक महंमद शाबान (वय, 25, रा. उत्तर प्रदेश ) हा  टँकर (क्रमांक एम.एच. 04 जी.आर. 3171) चिपळूण बाजूकडून  मुंबई दिशेन घेऊन जात होता. त्‍याचवेळी  रत्नागिरीच्या दिशेने जाणारा कुमार भिमाप्पा राठोड (वय 28 ) हा आपल्या ताब्यातील टँकर  (क्रमांक एम.एच.11.सी .एच .8114 ) घेऊन कशेडी घाटातून जात होता.  यावेळी येलगेवाडी गावाच्या हद्दीत एका अवघड वळणावर  या दोन वाहनात समोरासमोर टक्कर  झाली.  यात दोन्ही वाहनांचे नुकसान झाले मात्र सुदैवाने जीवितहानी टळली आहे.

 या अपघाताची माहिती समजताच कशेडी महामार्ग पोलिस मदत केंद्राचे सहा फौजदार मधुकर गमरे,  मोहिते, कुंभार, पाटील आणि इतर पोलिस कर्मचाऱ्यांनी  घटनास्थळी धाव घेऊन मदतकार्य केले.  त्‍यामुळे महामार्गावर दोन्ही बाजूकडील वाहतूक सुरळीत झाली आहे.