Sun, Sep 20, 2020 05:48होमपेज › Mumbai-Thane-Raigad › अतिवृष्टीमध्ये मुंबई महापालिका आयुक्त स्पॉटवर

अतिवृष्टीमध्ये मुंबई महापालिका आयुक्त स्पॉटवर

Last Updated: Aug 04 2020 12:04PM
मुंबई : पुढारी वृत्तसेवा 

बृहन्मुंबई महापालिका क्षेत्रात काल रात्रीपासून सुरू असलेल्या जोरदार पावसाच्या पार्श्वभूमीवर महापालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी आज ( दि ४ ) महापालिका क्षेत्रातील विविध ठिकाणांना भेटी देऊन तेथील परिस्थितीची पाहणी केली.

या पाहणी दौऱ्या दरम्यान त्यांच्या समवेत अतिरिक्त महापालिका आयुक्त  पी. वेलरसू, महापालिका उपायुक्त चंद्रशेखर चोरे, पायाभूत सुविधा विभागांचे संचालक संजय दराडे यांच्यासह महापालिकेचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित आहेत.

आजच्या पाहणी दौऱ्यादरम्यान वांद्रे पूर्व परिसरातील ओएनजीसी पातमुखाजवळील (ONGC outfall) भागाची महापालिका आयुक्तांनी पाहणी केली.

 "