Mon, Jan 25, 2021 01:13होमपेज › Mumbai-Thane-Raigad › मुंबई-गोवा महामार्गावर वीरगावानजीक अपघात, ४ जखमी

मुंबई-गोवा महामार्गावर वीरगावानजीक अपघात, ४ जखमी

Published On: Dec 25 2017 1:17PM | Last Updated: Dec 25 2017 1:17PM

बुकमार्क करा

नाते : वार्ताहर

मुंबई-गोवा महामार्गावर अपघातांची मालिका सुरूच असून आज सकाळी साडेनऊ वाजता वीर गावच्या हद्दीत मारुती वॅगनॉर व मिनीडोअर रिक्षेचा अपघात झाला, यामध्‍ये चार जण जखमी झाल्याची माहिती महाड शहर पोलिस ठाण्याकडून देण्यात आली आहे. जखमींवर दासगावच्या प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये उपचार करण्यात येत आहेत.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, कोकणातून मुंबईकडे जाणाऱ्या मारुती वॅगनॉर क्र. एमएच ०४ सी झेड २०३८ या गाडीला माणगावहून महाडकडे येणाऱ्या मिनीडोअर क्र. एमएच ०६ एस ३४६९ला यांच्‍या जोरदार धडक झाली. त्‍यामुळे मिनीडोअरमधील चार प्रवासी जखमी झाले आहे. याबाबतचे वृत्त समजताच स्थानिक ग्रामस्थांनी अपघातातील जखमींना दासगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात नेले. त्‍यामुळे जखमींवर वेळेवर उपचार करणे शक्य झाले.

दरम्यान, या अपघातामुळे महामार्गावरील विस्कळीत झालेली वाहतूक वाहतूक पोलिस व महाड शहर पोलिसांनी तातडीने केलेल्या कार्यवाहीमुळे पूर्ववत झाल्याचे चित्र पहावयास मिळाले. दासगाव आरोग्य केंद्राच्या डॉक्टरांशी संपर्क साधला असता त्यांनी जखमींवर तातडीने उपचार करण्यात आल्याची माहिती दिली आहे.