Tue, Jun 15, 2021 12:52
परमबीर सिंग यांना पुन्हा उच्च न्यायालयात दिलासा

Last Updated: Jun 10 2021 8:34PM

file photo
मुंबई : पुढारी ऑनलाइन 

मागिल काही महिन्यांपासून मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग वादाच्या भोवऱ्यात अडकले आहेत. त्यांच्यावर अ‍ॅट्रोसिटी अंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे. या गुन्हाच्या संदर्भात आज कोर्टात सुनावणी झाली. अ‍ॅट्रोसिटी अंतर्गत दाखल गुन्हाच्या संदर्भातील सुनावणीत परमबीर सिंग यांना दिलासा मिळाला आहे. परमबीर सिंग यांना आता ९ जूनपर्यंत अटक होणार नाही. महाराष्ट्र सरकारने या संदर्भातील माहिती उच्च न्यायालयात दिली आहे. तसेच आता या प्रकरणाची सुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे. 

अकोला येथे कार्यरत असलेले पोलिस निरीक्षक भीमराज घाडगे यांनी परमबीर सिंग यांच्या विरोधात तक्रार केली आहे. यांच्यासह 27 पोलिस अधिकाऱ्यांनी भिमराज घाडगे यांना जातीवाचक शिवीगाळ केल्याची तक्रार भिमराज घाडगे यांनी केली आहे. या प्रकरणाची न्यायालयात सुनावणी सुरू आहे.

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर 100 कोटी रुपयांची खंडणी मागितल्याचा आरोप केला होता. त्यानंतर परमबीर सिंग यांच्याविरुद्ध तीन वेगवेगळ्या तक्रारी दाखल झाल्या आहेत.

वाचा : पवारांचे राजकारण स्वाभिमानाचे की तडजोडीचे? राष्ट्रवादीच्या आधीही स्थापन केला ‘हा’ पक्ष 

वाचा : कपिल शर्मासोबत पुन्हा सुनिल ग्रोवर दिसणार पण...

वाचा : ठाकरे सरकारची शेतकऱ्यांसाठी खुशखबर पिक कर्जासाठी आता शुन्य टक्के व्याज