Mon, Aug 03, 2020 14:53होमपेज › Mumbai-Thane-Raigad › रक्तातील नात्यात एकाकडे जात वैधता प्रमाणपत्र पुरेसे

रक्तातील नात्यात एकाकडे जात वैधता प्रमाणपत्र पुरेसे

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

मुंबई : प्रतिनिधी

जात वैधता प्रमाणपत्र मिळविण्यासाठी सरकारी कार्यालयाचे उंबरठे झिजवण्याचा त्रास यापुढे वाचणार आहे. रक्ताच्या नात्यातील कोणत्याही एका व्यक्तिकडे असलेले जात  वैधता प्रमाणपत्र यासाठी पुरे ठरणार आहे. यासंदर्भातील राजपत्र प्रसिद्ध करण्यात आले आहे.

जात वैधता प्रमाणपत्र मिळण्याची प्रक्रिया सुलभ व्हावी. तसेच, नागरिकांना होणारा त्रास वाचावा यासाठी राज्य सरकारने हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. रक्तातील नात्यात एकाकडे जात वैधता प्रमाणपत्र असल्यास दुस-याला वैधतेसाठी नवीन पुरावे सादर करण्याची गरज भासणार नाही. अर्जदाराने सादर केलेल्या कागद पत्रांसंदर्भात काही आक्षेप असल्यास 60 दिवसांत त्याची पडताळणी करणे जात प्रमाणपत्र अधिकाऱ्याना बंधनकारक राहणार आहे.

या निर्णयामुळे वडील, सख्खे चुलते किंवा वडिलांकडील रक्ताच्या नात्यातील इतर कोणत्याही व्यक्तीकडे उपलब्ध असणाऱ्या जात वैधता प्रमाणपत्राला महत्त्वाचा पुरावा मानून, अर्जदारास जात प्रमाणपत्र तसेच जात वैधता प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. अनुसुचित जाती, विमुक्त जमाती, भटक्या जमाती तसंच ओबीसी वर्गातील नागरिकांना याचा मोठा फायदा होणार आहे.