Tue, Aug 11, 2020 21:30होमपेज › Mumbai-Thane-Raigad › मुंबई : भाजपच्या कोअर कमिटीची आज बैठक

मुंबई : भाजपच्या कोअर कमिटीची आज बैठक

Last Updated: Dec 10 2019 10:48AM

मुंबई : भाजपाच्या कोअर कमिटीची आज बैठकमुंबई : पुढारी ऑनलाईन 

भाजपच्या कोअर कमिटीची आज (ता.१०) मुंबईत बैठक होणार आहे. हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर भाजपची बैठक होणार आहे. यासोबतच सध्याच्या राजकीय परिस्थितीवर बैठकीत चर्चा होणार आहे. भाजपचे सर्व नेते बैठकीला उपस्थित राहणार आहेत. 

औरंगाबाद येथील बैठकीस पंकजा मुंडे या उपस्‍थितीत राहिल्‍या नव्‍हत्‍या. मात्र या बैठकीला पंकजा मुंडे उपस्‍थितीत राहणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तसेच एकनाथ खडसे यांच्‍या दिल्लीवारीवर बैठकीत चर्चा होणार असल्‍याची शक्‍यता राजकीय वर्तुळातून वर्तवली जात आहे.