Thu, Sep 24, 2020 15:55होमपेज › Mumbai-Thane-Raigad › सिद्धिविनायक मंदिरात सोमवारी दागिन्यांचा लिलाव

सिद्धिविनायक मंदिरात सोमवारी दागिन्यांचा लिलाव

Published On: Dec 23 2017 2:32AM | Last Updated: Dec 23 2017 1:58AM

बुकमार्क करा

मुंबई : प्रतिनिधी

मुंबईकरांचे श्रद्धास्थान असलेल्या प्रभादेवी येथील सिद्धिविनायक मंदिरात येत्या सोमवारी (25 डिसेंबर) रोजी श्री चरणी भक्तांनी अर्पण केलेल्या सोन्याच्या अलंकारांचा लिलाव पार पडणार आहे. यामध्ये श्रीगणेश प्रतिमा, लॉकेट्स, दूर्वा, मोदक, अंगठ्या, सोन्याच्या साखळ्या, हार यांचा समावेश आहे. देवदीपावलीच्या मुहूर्तावर आयोजित करण्यात आलेला प्रभादेवीच्या सिद्धिविनायक मंदिरातील सोन्याच्या दागिन्यांचा लिलाव स्थगित करण्यात आला होता. त्यानंतर सिद्धिविनायक गणपती मंदिर न्यास समितीने सोमवारी सकाळी 11 ते सायंकाळी 5 या कालावधीत मंदिराच्या सभामंडपात हा लिलावाचे आयोजन केले आहे. लिलावासाठी उपलब्ध असलेल्या अलंकारांपैकी काही अलंकार मंदिराच्या आवारात प्रदर्शनासाठी मांडण्यात येणार आहे. सिद्धिविनायक मंदिरात वर्षभर भाविक दागिने व रोख रक्कम अर्पण करीत असतात. हेच दागिने आता गणेशभक्तांना बाप्पाच्या दागिन्यांचा प्रसाद मिळणार आहे. लिलावासंबंधीचे सर्व अधिकार न्यासाने राखून ठेवलेले आहेत. या लिलावात गणेशभक्तांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन सिद्धिविनायक मंदिर न्यासाचे अध्यक्ष आदेश बांदेकर आणि मुख्य कार्यकारी अधिकारी संजीव पाटील यांनी केले आहे.