Wed, Sep 23, 2020 08:15होमपेज › Mumbai-Thane-Raigad › उपचारानंतर विजयाचे मुंबई दर्शन

उपचारानंतर विजयाचे मुंबई दर्शन

Published On: Dec 21 2017 7:30PM | Last Updated: Dec 21 2017 7:30PM

बुकमार्क करा

मुंबई : प्रतिनिधी

शिक्षिकेने 500 उठाबशा काढण्याची शिक्षा दिलेल्या विजया चौगुले हिची प्रकृती आता ठणठणीत असून गुरुवारी तिने मुंबईतील विविध पर्यटन स्थळांना भेट दिली. शुक्रवारी सायंकाळी ती कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड येथील आपल्या गावी परतणार आहे.

विजया चौगुलेला केईएम रूग्णालयातून बुधवारी डिस्चार्ज मिळाला. शिक्षकेने 500 उठाबशांची शिक्षा दिल्यानंतर कोल्हापूर येथून उपचाराच्या निमित्ताने प्रथमच मुंबईला आलेल्या विजयाला कोल्हापूरचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या मदतीने मुंबई दर्शन घडवून आणले. बुधवारी सायंकाळी गेट वे ऑफ इंडिया दर्शन त्यानंतर गुरुवारी दिवसभर मुंबई दर्शन घडविण्यात आले. तिच्यासोबत पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या निवासस्थानातील कर्मचारी, रुग्णसेवक, आई वडील होते. तारापूर मस्त्यालय, त्यानंतर नेहरु तारांगण, राणीची बाग पाहून नंतर तिने सिद्धिविनायक दर्शनही घेतले.

विजया व तिच्या आईवडीलांना मुंबईला येणे कधी जमलेच नव्हते. विजया गावी शिक्षण घेत असल्यामुळे तीही कधी मुंबईला आली नव्हती. उपचाराच्या निमित्ताने केईएममध्ये तीला दाखल करण्यात आले होते. बुधवारी तिला डिस्चार्ज देण्यात आल्यानंतर तिला मुंबई दर्शन घडवण्यात आले. शुक्रवारी ती आपल्या गावी परतणार आहे. शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी तिच्या पालकांना शाळा बदलून देण्याचेही आश्‍वासन दिले आले. या आजारपणाच्या काळात राहिलेला अभ्यास पूर्ण करण्यासाठी विजयाला आता मेहनत करावी लागणार आहे. 

उपचारानंतर तिला बरे वाटावे म्हणून तिला मुंबईतील प्रेक्षणीय स्थळेदाखवण्यात आली. आता ती पूर्ण बरी झाली आहे. त्यामुळे उद्या डॉक्टरांची भेट घेवून गावी जाण्याचे ठरवण्यात येणार असल्याचे विजयाचे वडील निवृत्ती चौगले यांनी सांगितले.