Tue, Jun 15, 2021 12:25
राज्यात म्युकरमायकोसीसचा धोका वाढला दोघांचा मृत्यू

Last Updated: May 11 2021 9:11PM

मुंबई : पुढारी ऑनलाईन 

देशात कोरोनाने पुन्हा डोक वर काढल आहे. दुसऱ्या लाटेत अनेकांना कोरोनाची लागण झाली आहे. देशातील अनेक जिल्हे लॉकडाऊन करण्यात आले आहेत. यातच आता राज्यात म्युकरमायकोसीमुळे कल्याण डोंबिवलीत दोन जणांचा मृत्यू झाला आहे. म्युकरमायकोसीसमुळे दोन रुग्णांचे मृत्यू ही घटना राज्यासाठी धोक्याची घंटा मानली जात आहे. 

वाचा :मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या शिष्टमंडळाने घेतली राज्यपालांची भेट

राज्यात आतापर्यंत केवळ ग्रामीण महाराष्ट्रातील लोकांना म्युकोरमायकोसिसची लागण झाल्याचे समोर आल आहे. पण आज कल्याणमध्ये दोन रुग्ण सापडल्याने शहरी भागातही भितीचे वातावरण झाले आहे. डोंबिवलीतील खासगी रुग्णालयात  सहा रुग्णांवर म्युकरमायकोसीसचे उपचार सुरु आहेत. 

म्युकोरमायकोसिस एक दुर्मीळ फंगल इंफेक्शन असून त्याला झिगॉमायकोसिस असे देखील म्हणतात. यात रोग आणि जंतूंचा सामना करण्याची क्षमता कमी होते. कोरोनामुक्त झाल्यानंतर मधुमेहींना हा आजार बळावला जातो. वेळेत उपचार घेतल्यास हा आजार लवकर बरा होऊ शकतो. यामुळे तोंडाच्या एका बाजूला सूज येणे, डोकेदुखी, सायनस रक्तसंचय, तोंडाच्या वरच्या भागात ताप येणे ही लक्षणे आहेत. म्युकरमाक्रोसिस हा नवीन आजार नाही. मात्र कोरोना नसताना वर्षा-दोन वर्षातून एखादी केस पहायला मिळायची. याचे प्रमाण देशभरात पहायला मिळत होते. दोन लाटांमध्ये हा फरक दिसत आहे. पहिल्या कोरोना लाटेत फार रुग्ण नव्हते. मात्र दुसऱ्या लाटेत चकीत करणारे प्रमाण दिसत आहे. या आजाराचे सायनसमधून संक्रमण सुरू होते. पुढे ते तोंडाच्या आतून वरचा जबडा, डोळा आणि मेंदूपर्यंत पोहोचते. या आजारामुळे डोळा कायमचा निकामी होतो. पॅरालिसिस आणि मृत्यूही यात ओढावण्याची शक्यता असते. मात्र वेळीच उपचार मिळाल्यास या आजाराचा रुग्ण ठणठणीत होऊ शकतो, असे वैद्यकीय तज्ज्ञांकडून सांगण्यात आले. मात्र प्रशासनाकडून या संदर्भात कुठलीही प्रतिक्रिया मिळू शकली नाही.

वाचा : कोरोनातून बऱ्या झालेल्या छोटा राजनची पुन्हा तिहार तुरुंगात रवानगी