Sat, Apr 10, 2021 20:46
'तूफ़ान'मध्‍ये फरहान अख्तरसोबत मृणाल ठाकूरचा मराठी तडका 

Last Updated: Apr 08 2021 4:31PM

मुंबई : पुढारी ऑनलाईन  

'बाटला हाऊस', 'सुपर 30' यांसारख्या हिट चित्रपटांमध्ये झळकलेली अभिनेत्री मृणाल ठाकुर आता फरहान अख्तर सोबत झळकणार आहे. राकेश ओमप्रकाश मेहरा यांचा आगामी चित्रपट ‘तूफान’ येत आहे. य़ा चित्रपटात खास मराठी संवाद ऐकायला मिळत आहेत.  

फरहान अख्तर, मृणाल ठाकुर सोबत परेश रावल आणि सुप्रिया पाठक हे कलाकार दिसणार आहेत. या स्पोर्ट्स ड्रामामध्ये मृणाल ठाकुर मराठीमध्ये बोलताना दिसत आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, या चित्रपटात ती मध्येच मराठी बोलताना दिसेल. त्यसोबतचं परेश रावलदेखील मराठीत उत्तर देतानाचा संवाद असेल. 

‘तूफ़ान’ची निर्मिती रितेश सिधवानी, राकेश ओमप्रकाश मेहरा आणि फरहान अख्तर यांनी केली आहे. त्याचा प्रीमियर २१ मे २०२१ रोजी रिलीज करण्यात येणार आहे.

मृणाल या चित्रपटाविषयी म्हणते की, 'मी अनन्याची व्यक्तिरेखा साकारतेय. अज्जू म्हणजेच फरहान अख्तरच्या जीवनात, आणि त्याच्या आजूबाजूच्या लोकांच्या जीवनातदेखील ही व्यक्तीरेखा प्रेरक आहे. ती खूप उदार, समर्पित आणि दूरदृष्टि असलेली मुलगी आहे.'