Sun, Oct 25, 2020 07:04होमपेज › Mumbai-Thane-Raigad › गुजराती पाट्यांवर मनसे सैनिकांकडून खळखट्याक(व्हिडिओ) 

गुजराती पाट्यांवर मनसे सैनिकांकडून खळखट्याक(व्हिडिओ) 

Published On: Mar 19 2018 9:41AM | Last Updated: Mar 19 2018 9:37AMमंबई : पुढारी ऑनलाईन

मुंबई-अहमदाबाद मार्गावरील हॉटेल-दुकानांवरील गुजराती पाट्या हटवल्या. घोषणा देत सुमारे १० ते १२ कार्यकर्त्यांनी या पाट्या हटवल्या. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी रविवारी मुंबईतील शिवाजी पार्कवरून केलेल्‍या भाषणात मुंबई-अहमदाबाद मार्गावरील गुजराती पाट्यांबाबत भाष्य केले होते. त्‍यांच्या भाषणानंतर आक्रमक झालेल्‍या मनसे सैनिकांनी गुजराटी पाट्या हटविल्‍या. 

मुबई अहमदाबाद महामार्गावर वसईत गुजराथी पाट्या लावण्यात आल्या आहेत. मनसेने हॉटेल चालकांना, पोलिस प्रशासनाला आणि पालिकेला अनेकदा पत्र देवून सुद्धा त्यांनी त्यांच्या पत्राला वाटण्याच्या अक्षता लावण्यात आल्या. काल (दि. १८ मार्च)रात्री राज ठाकरे यांच्या सभेहून घरी परतत असताना माजी जिल्हाध्यक्ष कुंदन संखे व त्यांच्या कार्यकर्त्यांनी एकच हल्लाबोल करत बोर्ड गुजराती बोर्ड फाडले. 

राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर यावेही आपल्‍या ठाकरे शैलीत हल्‍ला चढवला. ते म्‍हणाले, ‘‘महाराष्ट्राचे पाणी गुजरातला वळवले जात आहे. वसई-विरारमध्ये गुजराती लोकांची संख्या वाढत आहे. हा मोदी-शहा जोडगळीचा डाव असून, बीकेसीतील नोकऱ्या मोदींनी गुजरातला पळवल्या. मी गुजरात दौऱ्यावर असताना मोदींनी माझ्यासमोर चांगलं चित्र उभे केले. मात्र, ते खोटे होते. मोदींचा खरा चेहरा आता दिसला असून त्यांनी गुजरातची वाट लावली आहे, असा आरोप करत आजही मुंबई-अहमदाबाद मार्गावरील अनेक दुकान आणि हॉटेलवर मराठी ऐवजी गुजराती पाट्या असल्याचा उल्लेख त्यांनी आपल्या भाषणात केला होता.

Tags : mns chief raj thackeray, gudi padwa 2018, mumbai ahmedbad highway