Thu, Sep 24, 2020 11:31होमपेज › Mumbai-Thane-Raigad › राज ठाकरेंचा लातूर दौरा पुढे ढकलला

राज ठाकरेंचा लातूर दौरा पुढे ढकलला

Last Updated: Jan 28 2020 9:55AM

राज ठाकरे यांचा लातूर दौरा पुढे ढकललामुंबई : पुढारी ऑनलाईन

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी हिंदुत्वाचा झेंडा हाती घेतल्यानंतर ते आज पहिल्यांदाच मराठवाड्याच्या दौऱ्यावर जाणार होते. मात्र, हा दौरा पुढे ढकलण्यात आला आहे. प्रकृती अस्वस्थामुळे राज ठाकरेंचा दौरा पुढे ढकलल्याची माहिती एका वृत्तवाहिनीने दिली आहे.

लातूरमध्ये कृषी नवनिर्माण 2020 चे उद्घाटन राज ठाकरे यांच्‍या हस्ते होणार होते. हे कृषी प्रदर्शन तीन दिवस चालणार आहे. मात्र राज ठाकरे यांचा हा दौरा पुढे ढकलण्‍यात आला आहे. 

पक्षाचा झेंडा बदलल्यामुळे राज ठाकरेंचा हा दौरा महत्वाचा मानला जात होता. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या स्थापनेनंतर मराठवाड्यात त्यांना पाहिजे तसा जनाधार मिळाला नाही. कारण मनसेचा झेंडा आणि विचारसरणी आणि त्यातुलनेत शिवसेनेला मराठवाड्यामध्ये भरघोस यश मिळालं होतं. याचं कारण होतं कट्टर हिंदुत्ववाद. आता मनसेच्या झेंड्याचा रंग आणि पक्षाचे स्वरूपही बदललं आहे. त्यामुळेच राज ठाकरेंनी मराठवाड्यापासून दौऱ्याला सुरुवात केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. 

मराठवाड्यात मनसेचे एकमेव आमदार हर्षवर्धन जाधव होते. मात्र, नंतर त्यांनीही मनसेला सोडचिठ्ठी दिली. मराठवाड्यातील स्थानिक स्वराज्य संस्था, विधानसभा, लोकसभेच्या निवडणुकीत मनसेला अपेक्षित यश मिळाले नाही. त्‍यामुळे मनसेसाठी हा दौरा महत्‍वाचा आहे. 

 "