Mon, Nov 30, 2020 12:48होमपेज › Mumbai-Thane-Raigad › आता रोहित पवारांकडून पीएम मोदींचे कौतुक!

आता रोहित पवारांकडून पीएम मोदींचे कौतुक!

Last Updated: Nov 22 2020 12:35PM
मुंबई : पुढारी ऑनलाईन 

सौर ऊर्जा, इथेनॉल यासारख्या क्षेत्रांत केलेल्या कामाबद्दल आमदार रोहित पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच  कौतुक केल आहे. त्यानी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे कौतुक ट्विट करुन केले आहे.

वाचा : कॉमेडियन भारती सिंहचा पती अटकेत

गेल्या काही वर्षात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशाने सौर ऊर्जा, इथेनॉल यासारख्या क्षेत्रांत केलेलं काम हे निश्चितच उल्लेखनीय आहे. याबाबत केंद्र सरकारचं कौतुक करायलाच हवं. देशातील वाढत्या प्रदूषणाला आळा घालण्यासाठीही असंच काम होईल, असा विश्वास आहे. तसंच कोरोना हे दुसऱ्या महायुद्धानंतरचं जगापुढचं सर्वात मोठं आव्हान असून याविरोधात निर्णायक कृती करण्याचं आवाहन मोदीजींनी  #G20Summit परिषदेत जागतिक नेत्यांना केल्याने आनंद वाटला. त्यांनी या संकटाची जाणीव भाजपच्या राज्यातील नेत्यांनाही करुन दिली. तर ते या संकटाचा राजकीय खेळ थांबवतील. अस ट्विटमध्ये आमदार रोहीत पवार यांनी म्हटल आहे. 

आज आमदार रोहित पवार यांनी पंतप्रधान मोदी यांच सौर ऊर्जा, इथेनॉल यासारख्या क्षेत्रांत केलेल्या कामाबद्दल कौतुक केल आहे, तसेच त्यांनी देशातील वाढत्या प्रदूषणाला आळा घालण्यासाठीही काम होईल असं म्हटलं आहे. 

तसेच कोरोना हे दुसऱ्या महायुद्धानंतरचं जगापुढचं सर्वात मोठं आव्हान असून याविरोधात निर्णायक कृती करण्याचं आवाहन मोदीजींनी  #G20Summit परिषदेत जागतिक नेत्यांना केल्याने आनंद वाटला. त्यांनी या संकटाची जाणीव भाजपच्या राज्यातील नेत्यांनाही करुन दिली. तर ते या संकटाचा राजकीय खेळ थांबवतील. असा टोलाही त्यांनी राज्यातील भाजप नेत्यांना लगावला आहे. 

वाचा : काहीही झालं तरी त्या गायिकेवर लिहिलेली पोस्ट मी डिलीट करणार नाहीच : महेश टिळेकर

 

गेल्या काही वर्षात पंतप्रधान @narendramodi जी यांच्या नेतृत्वाखाली देशाने सौर ऊर्जा, इथेनॉल यासारख्या क्षेत्रांत केलेलं काम हे निश्चितच उल्लेखनीय आहे. याबाबत केंद्र सरकारचं कौतुक करायलाच हवं. देशातील वाढत्या प्रदूषणाला आळा घालण्यासाठीही असंच काम होईल, असा विश्वास आहे. pic.twitter.com/LaS50UG6u1

— Rohit Pawar (@RRPSpeaks) November 22, 2020