Thu, Jan 21, 2021 17:18
धनंजय मुंडेंवर बलात्काराचे आरोप; पोलिसांकडून जबाब नोंदवण्याची प्रक्रिया सुरु

Last Updated: Jan 14 2021 1:57PM
मुंबई : पुढारी ऑनलाईन 

राज्याचे सामाजिक न्याय मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते धनंजय मुंडे यांच्यावर बलात्काराचा आरोप झाल्यानंतर राजकीय वर्तुळात मोठा भुकंप झाला. प्रमुख विरोधी पक्ष भाजपने मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली आहे. दरम्यान, राष्ट्रवादीचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांनी आरोप केल्यानंतर कोणी आरोप केल्यानंतर राजीनामा देण्याची आणि घेण्याची गरज नाही. आरोपांची शहानिशा करुनच पक्ष निर्णय घेईल असे स्पष्ट केले. त्यानंतर आता पोलिसांनी आरोप करणाऱ्या महिलेचा जबाब नोंदवण्याची प्रक्रिया सुरु केली आहे. दरम्यान, मुंडेंवर राजीनामा देण्यासाठी दबाव वाढत आहे.

कशिश ऑर्केस्ट्रा बारमध्ये वेगळीच 'कशिश'

धनंजय मुंडे यांच्यावर गायक असणाऱ्या एका परिचयाच्या महिलेने बलात्कारासारखा गंभीर आरोप केला होता. त्यानंतर धनंजय मुंडे यांनी त्याच्यावर आपली प्रतिक्रिया देत हे आरोप ब्लॅकमेल करण्यासाठी करण्यात आल्याचे स्पष्टीकरण दिले होते. दरम्यान, या प्रकरणी भाजपने धनंजय मुंडेंचा मंत्रीपदाचा राजीनामा घ्यावा अशी मागणी केली होती. पण, राष्ट्रवादीच्या नेत्यांनी या आरोपांची पोलिस शहानिशा करतील आणि त्या आधारेच पक्ष काय निर्णय घ्यायचा हे ठरवेल असे स्पष्ट केले. धनंजय मुंडेंनीही राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली होती. 

नाशिकच्या उमरणेत सरपंचांसाठी लागली तब्बल २ कोटींची बोली, आयोगाकडून निवडणूकच रद्द  

दरम्यान, थोड्याच वेळात जयंत पाटील, अजित पवार, प्रफुल्ल पटेल या यासारख्या राष्ट्रवादीच्या बड्या नेत्यांची बैठक होणार आहे. या बैठकीला शरद पवारही उपस्थित राहण्याची शक्यता आहे. याचबरोबर धनंजय मुंडे हे मंत्रीपदाचा राजीनामा देण्याचीही शक्यता वर्तवण्यात येत आहे.