Wed, Sep 23, 2020 01:57होमपेज › Mumbai-Thane-Raigad › म्हणून संजय राऊत राज्यपालांच्या भेटीला!

म्हणून संजय राऊत राज्यपालांच्या भेटीला!

Last Updated: May 23 2020 4:50PM

शिवसेना खासदार संजय राऊतमुंबई : पुढारी वृत्तसेवा

महाराष्ट्रात कोरोनाचा कहर सुरु आहे. त्यातच राजकारणही तापले आहे. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आज, शनिवारी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली. त्यांच्या भेटीनंतर राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. मात्र, माध्यमांशी बोलताना राज्यपालांची भेट ही सचिच्छा भेट असल्‍याचे राऊतांनी स्पष्ट केले. 

वाचा : धडकने लगा दिल, नजर झुक गई; कभी उन से जब 'सामना' हो गया!

महाविकास आघाडी सरकार आणि राज्यपाल यांच्यात तणाव निर्माण झाला आहे. याच पार्श्वभूमीवर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी राज्यपालांची भेट घेतली होती. आता भेटीनंतर महाविकास आघाडीच्या नेत्यांची राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली बैठक होत आहे.

राज्यपालांच्या भेटीनंतर संजय राऊतांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, गेल्या काही खूप दिवसांपासून आमची भेट राहिली होती. ही एक सदिच्छा भेट आहे. राज्यपाल कोश्यारी आमचे मार्गदर्शक आहेत.

ते म्हणाले की, राज्यपाल आणि मुख्यमंत्री यांच्यातील संबंध अत्यंत मधूर आहेत. दोघांना एकमेकांबद्दल प्रेम आणि आदर आहे. राज्यपाल आणि मुख्यमंत्री यांच्यातील संबंध जसे पिता-पुत्राचे असतात तसेच आहेत आणि ते तसेच राहतील. आमच्यात कोणतीही दरी नाही, असेही राऊतांनी यावेळी स्पष्ट केले. 

वाचा : ‘राज्यपाल आणि मुख्यमंत्री हे पिता-पुत्रासारखे’

राऊत यांनी राज्यपालांच्या भेटीदरम्यानचा फोटो आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवर शेअर केला. शेअर करत असताना, ''माझ्यापेक्षा हे थोर आहेत त्यामुळे त्यांना माझा नमस्कार. भेटीदरम्यान आमच्यात चांगला संवाद झाला. काळजी करून नका आमच्या महाविकास आघाडीच्या नेतृत्वाखाली उद्धव ठाकरेंचे सरकार ठीक सुरू आहे. असे राज्यपालांना सांगितले असल्याचे राऊत यांनी कॅप्शनमध्ये म्हटले आहे. 

 "