Mon, Jul 06, 2020 12:17होमपेज › Mumbai-Thane-Raigad › अयोध्या में मंदिर, महाराष्ट्र मे सरकार; संजय राऊतांची टोलेबाजी सुरुच!

अयोध्या में मंदिर, महाराष्ट्र मे सरकार; संजय राऊतांची टोलेबाजी सुरुच!

Last Updated: Nov 09 2019 3:50PM

संजय राऊतमुंबई : पुढारी ऑनलाईन 

अयोध्या प्रकरणाचा निकाल सुप्रीम कोर्टाने आज दिला. वादग्रस्त जमीन रामलल्लाची असल्याचा ऐतिहासिक निर्णय सुप्रीम कोर्टाने दिला. या निकालाच्या पार्श्वभूमीवर शिवसेना नेते संजय राऊत यांनी ट्विट करुन पुन्हा भाजपला डिवचण्‍याचा प्रयत्‍न केला. 

अयोध्येत राम मंदिर तर महाराष्ट्रात सरकार, जय श्री राम, असे शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी ट्विट केले. अयोध्येचा निकाल लागला आहे आता महाराष्ट्रात सरकार स्थापन होईल असे संकेत त्यांनी या ट्‍वीटमधून दिले.

काही दिवसापूर्वी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी अयोध्‍येचा दौरा केला होता. त्‍यावेळी शिवसेनेकडून शरयु नदीकाठी महाआरतीचे आयोजन देखील करण्‍यात आले होते. या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर राज्यभरात 'पहले मंदिर फिर सरकार' अशा आशयाचे बॅनर्स लागले होते. 

यासोबतच सुप्रीम कोर्टाच्‍या या निर्णयाचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, बिहारचे मुख्‍यमंत्री नितीश कुमार तसेच दिल्‍लीचे मुख्‍यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी  देखील स्‍वागत केले आहे.