होमपेज › Mumbai-Thane-Raigad › विधानसभा कामकाज सल्लागार समितीची स्थापना 

विधानसभा कामकाज सल्लागार समितीची स्थापना 

Last Updated: Dec 07 2019 2:17AM

संग्रहित छायाचित्रमुंबई : विशेष प्रतिनिधी

नागपूरमध्ये १६ डिसेंबरपासून सुरु होणाऱ्या विधिमंडळाच्या दिवाळी अधिवेशनापूर्वी विधानसभा सदस्यांची कामकाज सल्लागार समिती स्थापन करण्यात आले आहे.

विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती स्थापन झाली आहे. या समितीमध्ये सदस्य म्हणून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस,  बाळासाहेब थोरात, जयंत पाटील, एकनाथ शिंदे यांची  वर्णी लागली आहे.

याशिवाय राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार, माजी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, भाजपचे विधानसभा सदस्य चंद्रकांत पाटील, सुधीर मुनगंटीवार, राधाकृष्ण विखे- पाटील आणि गिरीश महाजन यांची ही नियुक्ती करण्यात आली आहे.

आमदार दिलीप वळसे-पाटील, सुनील प्रभू आणि अमीन पटेल यांनाही या समितीत निमंत्रित सदस्य म्हणून स्थान देण्यात आले आहे.