Thu, Aug 06, 2020 03:40होमपेज › Mumbai-Thane-Raigad › महाराष्ट्र क्रांती सेनेकडून १० जागेची मागणी

महाराष्ट्र क्रांती सेनेकडून १० जागेची मागणी

Published On: Sep 11 2019 8:51AM | Last Updated: Sep 11 2019 8:51AM

महाराष्ट्र क्रांती सेनेकडून महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे १० जागेची लेखी मागणी करण्यात आली.मुंबई : पुढारी ऑनलाईन

महाराष्ट्र क्रांती सेना, या घटक पक्षाने भाजपकडे १० जागेची मागणी केली आहे. याबाबत पक्षाच्यावतीने काल, महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे लेखी मागणी करण्यात आली आहे. 

यावेळी पक्ष प्रमुख सुरेश पाटील, भारत पाटील, सुशांत पाटील आदा पदाधिकारी उपस्थित होते.

मराठा समाजाच्या प्रश्‍नावर लढण्यासाठी महाराष्ट्र क्रांती सेना या पक्षाची स्थापना करण्यात आली आहे. तो भाजप- शिवसेनेचा घटक पक्ष आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे या दोघांनीही घटक पक्ष म्हणून मान्यता देताना मराठा समाजाच्या प्रश्‍नांची सोडवणूक करण्याची हमी महाराष्ट्र क्रांती सेनेला याआधी दिली होती. 

मराठा क्रांती मोर्चानंतर सुरेश पाटील यांनी महाराष्ट्र क्रांती सेनेची स्थापना दिवाळीच्या मुहुर्तावर केली होती. या पक्षातर्फे राज्यात लोकसभा आणि विधानसभा निवडणूक लढविण्याचेही जाहीर केले होते. मात्र, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उध्दव ठाकरे यांनी त्यांना मराठा समाजाच्या प्रश्‍नांची यापुढेही सोडवणूक करण्याची हमी दिल्यानंतर पाटील यांनी  भाजप -शिवसेना युतीसोबत काम करण्याचा निर्णय घेतला होता.