Thu, Jul 09, 2020 22:30होमपेज › Mumbai-Thane-Raigad › जितेंद्र आव्हाड यांच्यासोबतच्या १३ जणांना केलं 'होम क्वारंटाईन'

जितेंद्र आव्हाड यांच्यासोबतच्या १३ जणांना केलं 'होम क्वारंटाईन'

Last Updated: Apr 13 2020 8:50PM

राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड 

 

मुंबई : पुढारी वृत्तसेवा

राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड हे स्वत: होम क्वारंटाईन असताना, आता त्यांच्यासोबतच्या १३ जणांना देखील कोरोना संसर्गाचा धोका लक्षात घेऊन होम क्वारंटाईन करण्यात आलं आहे.
कोरोना पॉझिटिव्ह आढळलेल्या एका पोलिस कर्मचाऱ्याच्या संपर्कात आल्यामुळे मंत्री जितेंद्र आव्हाड स्वत: 'होम क्वारंटाइन' झाले आहेत. त्यांच्यासोबत आता १३ जणांना होम क्वारंटाइन केलं आहे.
मुंब्रा येथील एक वरिष्ठ पोलिस कर्मचाऱ्याला कोरोनाची लागण झाली आहे. जितेंद्र आव्हाड हे त्याच्या संपर्कात आले होते. यामुळे त्यांनीही 'होम क्वारंटाइन'चा निर्णय घेतला. त्याचा अहवाल निगेटिव्ह आला आहे.

वाचा : राज्यात सहा दिवसांत कोरोना रुग्ण दुपटीने वाढले

महाराष्ट्रात कोरोनाचा धोका वाढतच आहे. महाराष्ट्रातील कोरोना रुग्णांचा आकडा २ हजारावर गेला आहे. त्यामुळे दोन हजाराचा आकडा पार करणारे महाराष्ट्र देशातील पहिले राज्य आहे. तर अवघ्या सहा दिवसांत राज्यातील रुग्णांचा आकडा दुपटीने वाढला आहे.

महाराष्ट्रातील रुग्णांचा आकडा २,०६४ झाला आहे. ७ एप्रिल रोजी राज्यातील रुग्णांची संख्या १ हजाराच्या आसपास होती. हा आकडा आता दुपटीने वाढला आहे. राज्यात नवीन ८२ रुग्ण आढळून आले आहेत. त्यात मुंबईतील ५९ रुग्णांचा समावेश आहे.

वाचा : मुंबई-पुणे वगळून अन्य जिल्ह्यांतील उद्योग सुरु करण्यासाठी हालचाली