Thu, May 28, 2020 12:00होमपेज › Mumbai-Thane-Raigad › शिवस्मारकासाठी महाराष्ट्र सरकार सर्वोच्च न्यायालयात

शिवस्मारकासाठी महाराष्ट्र सरकार सर्वोच्च न्यायालयात

Last Updated: Jan 14 2020 5:12PM
नवी दिल्ली : पुढारी ऑनलाईन 

अरबी समुद्रात उभारण्यात येणार्‍या छत्रपती शिवाजी महारांच्या स्मारकाचे काम लवकरात लवकर सुरू व्हावे,  यासाठी राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. या प्रकरणावर तातडीने सुनावणी घेण्याची मागणी राज्यसरकार कडून करण्यात आली आहे . सरन्यायाधीश शरद बोबडे यांच्या खंडपीठाने दोन आठवड्यांनंतर ही सुनावणी घेण्यास सहमती दर्शवली आहे, अशी माहिती सहाय्यक सरकारी वकील अँड.सचिन पाटील यांनी दिली. 

स्मारकामुळे पर्यावरणाला नुकसान पोहचत असल्याचा दावा करीत पर्यावरण प्रेमींनी न्यायालयात याचिका दाखल केली आहे. न्यायालयाने यापूर्वीच याचिकेसंबधी नोटीस बजावली होती. न्यायालयाने त्यावेळी स्थगिती आदेश दिले नसले, तरी काम न करण्याचे तोंडी आदेश दिले होते. स्मारकाच्या कामाला पर्यावणविषयक परवानग्या देणार्‍या निर्णयाला जनहित याचिकेतून आव्हान देण्यात आले आहे. स्मारकाचा कामासाठी त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाची मंजुरी राज्य सरकारसाठी आवश्यक राहणार आहे. पुढील सुनावणीकडे त्यामुळे सर्वांचे लक्ष लागले आहे.