Thu, Jan 21, 2021 02:12होमपेज › Mumbai-Thane-Raigad › एक्झिट पोलचा अंदाज : महायुती सुसाट, आघाडी भुईसपाट! 

एक्झिट पोल : महायुती सुसाट, आघाडी भुईसपाट! 

Last Updated: Oct 22 2019 8:26AM

संग्रहित छायाचित्रपुढारी ऑनलाईन डेस्क 

गेल्या महिनाभरापासून सुरू असलेल्या निवडणूक महासंग्रामाला काल (ता.२१) पूर्णविराम मिळाला. संपूर्ण राज्यात अत्यंत चुरशीने २८८ मतदारसंघांमध्ये सरासरी ६०.४६ टक्के मतदान झाले. मतमोजणी २४ ऑक्टोबरला होणार आहे. त्यामुळे आगामी दोन दिवस सर्वांचेच देव पाण्यात असणार आहेत.

दिवाळी कुणाची होणार आणि दिवाळं कोणाचं निघणार याचेही उत्तरही त्याच दिवशी मिळणार आहे. सत्ताबदल होणार की आघाडी चमत्कार करणार? तसेच मनसे फॅक्टर काय करणार? याचेही उत्तर त्याच दिवशी मिळणार आहे. राज्यात गेल्या दोन एक महिन्यात राज्यातील दिग्गज नेत्यांनी प्रचाराचा धुरळा उडवून दिला होता. प्रचारामध्ये अनेकवेळा प्रचाराची पातळी ओलांडली गेली.    

दरम्यान, सायंकाळी ६ वाजता मतदान समाप्त झाल्यानंतर विविध वृत्तवाहिन्यांनी आपले एक्झिट पोल सादर केले आहेत. या पोलमधून आलेल्या आकडेवारीमधून राज्यात महायुतीच पुन्हा सत्तेवर येणार असल्याचे स्पष्ट संकेत मिळाले आहेत. एबीपी माझा आणि सी व्होटरने केलेल्या सर्व्हेत महायुतीला १९१ ते २१६ जागा दाखवल्या आहेत. महाआघाडीला ५५ ते ८१ जागा दाखवल्या आहेत. इतरांना ४ ते २१ जागा जिंकल्या आहेत. 

टीव्ही नाईन आणि सिसेरो एक्झिट पोलचा अंदाजातही महायुतीला स्पष्ट बहुमत दिले आहे. भाजपला १२३, शिवसेनेला ७४, काँग्रेसला ४० राष्ट्रवादीला ३५ आणि मनसेला ० जागा दाखवली आहे. इतरांना १६ जागा दाखवल्या आहेत. महायुतीला १९७ जागा मिळतील असा अंदाज वर्तवला आहे. महाआघाडीला ७५ जागा मिळतील असा अंदाज दिला आहे. 

न्यूज १८ लोकमत आणि आयपीएसओएसने  मतदानोत्तर चाचणीतमध्येही महायुतीला स्पष्ट बहुमत दिले आहे. महायुतीला २४३ जागा मिळण्याचा अंदाज दिला आहे. महाआघाडीला ४१ जागा मिळतील असे म्हटले आहे. पश्चिम महाराष्ट्र वगळून आघाडी उर्वरीत राज्यात एकेरी आकड्यांवर समाधान मानावे लागेल असे म्हटले आहे.