Thu, Jun 04, 2020 12:21होमपेज › Mumbai-Thane-Raigad › 'म्हणून' विधानसभेच्या रणांगणात; राज ठाकरेंकडून पहिल्या सभेत रणनीती स्पष्ट!

'म्हणून' विधानसभेच्या रणांगणात; राज ठाकरेंकडून पहिल्या सभेत रणनीती स्पष्ट!

Last Updated: Oct 10 2019 7:56PM

राज ठाकरेमुंबई : पुढारी ऑनलाईन

महाराष्ट्र विधानसभेसाठी अखेरच्या क्षणी उतरलेल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची पहिली सभा मुंबईमधील सांताक्रुझमध्ये झाली. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पहिल्याच सभेतून खड्ड्यावरून निशाणा साधलाच, पण आगामी वाटचालही स्पष्ट केली. 

राज म्हणाले, मी या विधानसभेला तुमच्याकडे एक मागणं घेऊन आलो आहे. ते मागणं म्हणजे या राज्याला गरज आहे सक्षम, प्रबळ, कोणासमोर न घरंगळत जाणारा विरोधी. सत्तेतला आमदार सरकारला प्रश्न विचारू शकत नाही, पण विरोधी पक्षातला आमदार सरकारला नामोहरम करू शकतो. मी आज प्रबळ विरोधी पक्ष म्हणून समोर येत आहे.  ते पुढे म्हणाले, पीएमसी बँक बुडाली, लोकांचे हक्काचे पैसे त्यांना काढता येत नाहीत. बरं या बँकेवर अधिकारी पदावरची माणसं कोण तर भाजपची. शेतकरी, कामगार देशोधडीला लागलेत, तरुण बेरोजगार झालेत आणि सरकार कसंही वागतात, न्यायालयांकडून निर्णय मिळत नाहीत. मग जनतेचा राग कोण व्यक्त करणार?

राज ठाकरेंचा हल्लाबोल... 

शहरांचं नियोजन कोसळलंय, निवडणुका आल्या की जाहीरनामे बाहेर येतात, वाट्टेल ती आश्वासन दिली जातात. पुन्हा परिस्थिती जैसे थे. आणि विरोधी पक्षाचे नेतेच सत्ताधारी पक्षात जाऊन बसतात आणि सत्ताधारी आमदार गप्प बसतात मग तुमचे प्रश्न मांडणार कोण?

ठाण्यात एक मुलगी स्वतःच्या लग्नाची खरेदी करायला निघाली आणि खड्ड्यात पडून ती अपघातात मृत्युमुखी पडली. शहरांचा पार विचका झालाय. अर्ध्या तासाच्या पावसाने पुण्याची जरी अशी अवस्था होत असेल तर काय बोलायचं?

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या उमेदवारांना प्रचंड मतांनी विजयी करा, कारण माझे उमेदवारच सत्ताधाऱ्यांना प्रश्न विचारतील, त्यांना उत्तरं द्यायला भाग पाडतील. जोपर्यंत प्रबळ विरोधी पक्ष नसेल तोपर्यंत हे सरकार तुमचं कोणतंही काम करणार नाही. 

जेव्हा जेव्हा आपल्या सणांवर बंदी आणायचा प्रयत्न केला तेंव्हा महाराष्ट्र नवनिर्माण सेना उभी राहिली आणि सण साजरे केले