Wed, Jul 08, 2020 03:50होमपेज › Mumbai-Thane-Raigad › 'शिवसेना सहन करेल पण भाजप आणि जनता तुम्हाला धडा शिकवेल'

'शिवसेना सहन करेल पण भाजप आणि जनता तुम्हाला धडा शिकवेल'

Last Updated: Feb 21 2020 1:15AM
मुंबई: पुढारी ऑनलाईन

ऑल इंडिया मजलिस ए इत्तेहादुल मुस्लिमीन (एआयएमआयएम)चे राष्ट्रीय प्रवक्ते वारीस पठान यांनी आपण (मुस्लिम) देशात केवळ १५ कोटी आहोत, परंतु जर आपण रस्त्यावर उतरलो तर देशातील १०० कोटी (हिंदू) लोकांना भारी पडू असे वादग्रस्त वक्तव्य सभेला संबोधीत करताना केले. त्यांच्या या वक्तव्यामुळे राजकारण चांगलेच तापले आहे. महाराष्ट भाजपने पठाण यांच्या वक्तव्यावर पलटवार करत शिवसेनेचे महाराष्ट्र सरकार तुम्हाला सहन करेल पण भाजप आणि जनता तुम्हाला धडा शिकवेल असा इशारा दिला आहे. 

‘१५ कोटी आहोत, पण १०० कोटींना भारी आहोत लक्षात ठेवा’

महाराष्ट्र भाजपने ट्विट करत पठाण यांच्या वक्तव्याला प्रत्युत्तर दिले आहे. अरे वारीस पठान कोणाला घाबरवताय? अशा शब्दात महाराष्ट्र भाजपने पठाण यांना सवाल केला. शिवसेनेचे महाराष्ट्र सरकार तुमच्या धमक्यांना शांतपणे सहन करेल असे सांगत भाजप व महाराष्ट्राची जनता तुम्हाला असा धडा शिकवणार की तुमची ही भडकाऊ भाषण सुद्धा बंद होतील. असा सज्जड दम भाजपने भरला आहे. 

काय केले होते वारीस पठाण यांनी वक्तव्य

कर्नाटकमधील गुलबर्गा येथे नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या विरोधात आंदोलन सुरू आहे. या ठिकाणी १५ फेब्रुवारीला सभा झाली. सभेला संबोधित करताना पठान यांनी वादग्रस्त वक्तव्य केले. या सभेला एमआयएमचे अध्यक्ष खासदार असदुद्दीन ओवेसी उपस्थित होते. या दरम्यानचा पठान यांनी केलेल्या भाषणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. 

कट, कॉपी, पेस्टचा जनक काळाच्या पडद्याआड

या व्हिडिओमध्ये ते असे म्हणत आहेत की, आपण (मुस्लिम) देशात केवळ १५ कोटी आहोत, परंतु जर आपण रस्त्यावर उतरलो तर देशातील १०० कोटी (हिंदू) लोकांना भारी पडू. स्वातंत्र्य घ्यावं लागेल व जी गोष्ट मागितल्याने मिळत नाही, ती हिसकावून घ्यावी लागेल. हे लक्षात असू द्या. आता वेळ आली आहे. असे पठाण यांनी यावेळी म्हटले आहे.