Wed, Dec 02, 2020 08:36होमपेज › Mumbai-Thane-Raigad › कल्याण डोंबिवलीत सुद्धा लॉकडाऊन वाढला

कल्याण डोंबिवलीत सुद्धा लॉकडाऊन वाढला

Last Updated: Jul 10 2020 8:06PM

संग्रहित छायाचित्रकल्याण : पुढारी ऑनलाईन

कल्याण डोंबिवली महानगर पालिका क्षेत्रात कोरोना रुग्णाची संख्या कमी होण्या ऐवजी अधिकच वाढत चालली असल्याने पालिकेची आरोग्य यंत्रणा कोलमडून गेली आहे. कोरोनाचा पादूर्भाव रोखण्यासाठी पालिका प्रशासनाने युद्ध पातळीवर उपाययोजना सुरू केले असताना रुग्ण संख्या रोखण्यासाठी पालिका प्रशासनाने २ जुलै ते १२ जुलै या कालावधीत आठ दिवसासाठी लोकडाऊण लागू करूनही कोरोनाचा पादूर्भाव शमत नसून रुग्ण संख्या अधिकच वाढत चालले आहे.

विशेष म्हणजे लॉकडाऊनच्या २ जुलै पासूनच्या आजमितीपर्यंतच्या कालावधीत कोरोनाची ४०३२ रुग्नांची भर तर ४५ रुग्ण दगावले आहेत. नागरिकाच्या गर्दीमुळे कोरोनाचा प्रसार अधिकच होत असल्याने अखेरीस पालिका प्रशासनाच्या वतीने पालिका आयुक्त डॉ.विजय सूर्यवंशी यांनी शहरात आणखी ७ दिवस लॉकडाऊन करण्याचा निर्णय आयुक्तांनी घेतला असून लोकडाऊन चा कालावधी १९ जुलै पर्यत कायम करण्यात आला आहे.

कल्याण डोंबिवली शहरातील कोरोना रुग्णाचा आकडा दिवसागणिक वाढत असून नागरिकाच्या गर्दीमुळे कोरोनाचा प्रसार होण्यास हातभार लागत असल्या मुळेच जिल्हाधिकार्याच्या निर्देशां प्रमाणे पालिका आयुक्तांनी शहरात २ जुलै पासून १२ जुलै पर्यत लॉकडाऊन जाहीर केला होता. मात्र या कालावधीत रुग्ण संख्या कमी होण्या ऐवजी अधिकच वाढत चालली असल्याचे दिसून येत आहे.

२ जुलै ते १० जुलै या नऊ दिवसाच्या लॉक डाऊनच्या कालावधीत पालिका क्षेत्रात ४०३२ नव्याने रुग्णाची भर झाली आहे तर २५ रुग्ण दगावल्याने पालिका क्षेत्रात भीतीचे वातावरण पसरले आहे  लॉकडाऊण कडक लागू केला असतानाही नागरिकां कडून लॉकडाऊनच्या नियमांची पायमल्ली केली जात असल्याने कोरोनाचा पादूर्भाव अधिकच वाढत असल्याचे जाणकारांचे मत आहे एकीकडे दिवसागणित  शहरात मिळणारे कोरोना रुग्ण आणि त्याचा होत असलेला प्रसार पाहता शहरात आणखी सात  दिवसाचे लॉकडाऊन करण्याचा निर्णय आयुक्तांनी घेतला आहे.

रविवार सकाळी ७ वाजल्यापासून रविवार १९ जुलैच्या संध्याकाळ पर्यत शहरात लॉकडाऊन कायम राहणार असून लॉकडाऊन साठी घालून दिलेले नियम तसेच राहणार असल्याचेहि आयुक्तांनी आपल्या आदेशात म्हटले आहे. तसेच नागरिकांनी लॉकडाऊन काळात नागरिकांनी सूचनांचे पालन करावे असे आवाहन पालिका आयुक्त डॉ विजय सुर्यवंशी यांनी केले आहे.

कल्याण डोंबिवली मनपात ६०६  नव्या रुग्णाची भर 

कल्याण डोंबिवली महानगर पालिका क्षेत्रात दिवसेंदिवस कोरोना बाधित रुग्णाच्या संख्येत वाढ होत चालली असून शुक्रवारी पालिका क्षेत्रात नव्याने ६०६ रुग्णाची भर झाली असून आठ रुग्ण दगावल्याने आजमिती पर्यंतच्या कोरोना बाधित रुग्णाची संख्या ११ हजार ५१७ झाली आहे तर मृत्यूला सामोरे गेलेल्या रोगणाची संख्या  वर जाऊन पोहचली आहे.तर २४ तासात तब्बल ५२५ रुग्णांना डिस्चार्ज मिळाला आहे. पालिका क्षेत्रात शुक्रवारी सापडलेल्या ६०६ नव्या रुग्णा मध्ये सर्वाधिक १९० रुग्ण कल्याण पश्चिम परिसरात सापडले