Thu, Jan 21, 2021 02:04



होमपेज › Mumbai-Thane-Raigad › दीपावलीत लोकल डब्यात वायफाय सेवा

दीपावलीत लोकल डब्यात वायफाय सेवा

Last Updated: Oct 17 2019 12:56AM




ठाणे : प्रतिनिधी 

अनेक वेळा प्रवाशांना लोकल प्रवासादरम्यान मोबाईलवरून बोलत असताना नेटवर्क नसल्यामुळे बोलता येत नाही. परिणामी अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. यामुळे आता रेल्वे प्रशासनाने लोकल डब्यामध्येच मोफत वायफाय सुविधा देण्याचा निर्णय घेतला असून दीपावलीत प्रवाशांना या सुविधेचा लाभ घेता येणार आहे.

अनेक वेळा लोकलप्रवास करताना इंटरनेटच्या समस्या उद्भवतात. यामुळे प्रवाशांच्या मनस्तापात आणखी भर पडते. मुंबईकरांना विनाइंटरनेट सुविधा पुरवण्यासाठी मध्य रेल्वेने लोकल डब्यात वायफाय बसविण्याचा निर्णय घेतला असल्याने प्रवाशांना याचा चांगलाच फायदा होणार आहे.

मध्य रेल्वेवरील 165 लोकलमध्ये वायफाय इंटरनेट सेवा बसविण्याचा निर्णय घेण्यात आला. यात प्री-लोडेड चित्रपट, मालिका आणि गाणी यांचा समावेश असेल. याचा वापर करण्यासाठी प्रवाशांना केवळ मोबाईल वायफाय सुरू करणे गरजेचे आहे. वायफाय लॉगीन केल्यानंतर प्रवाशांना प्री-लोडेड माहिती मोबाईलवर पाहायला मिळेल. यामुळे प्रवाशांच्या इंटरनेट डेटाची देखील बचत होणार आहे.प्री-लोडेड वायफायसाठी मध्य रेल्वेने खासगी कंपनीबरोबर पाच वर्षांचा करार केला असून या करारानुसार मध्य रेल्वेला या वायफाय सेवा वापरल्यामुळे लाखो रुपयांची भर पडणार आहे.