होमपेज › Mumbai-Thane-Raigad › लॉकडाऊनमध्ये २० एप्रिलपासून काय सुरू होणार आणि काय बंद राहणार?

लॉकडाऊनमध्ये २० एप्रिलपासून काय सुरू होणार आणि काय बंद राहणार?

Last Updated: Apr 18 2020 10:07AM

संग्रहित छायाचित्रमुंबई : पुढारी वृत्तसेवा

राज्य शासनाने आज (ता.१८) लॉकडाऊनसंदर्भात नवी सर्वसमावेशकअधिसूचना जारी केली असून यात अतिरिक्त औद्योगि घटकांसह शेतीविषय्क बाबी, बांधकाम क्षेत्र आदींना अधिक सूट देण्यात आली आहे. ऑनलाईन आणि दूरस्थ शिक्षणाला प्रोत्साहन देण्यात आले असून सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे पालन करून मनरेगा अंतर्गत कामे करण्याचा समावेश या अधिसूचनेत करण्यात आला आहे.

अधिक वाचा : लॉकडाऊनसंदर्भात राज्य शासनाची नवी सर्वसमावेशक अधिसूचना जारी

राज्य शासकीय कार्यालयांमध्ये 10 टक्के अधिकारी-कर्मचार्‍यांची उपस्थिती अनिवार्य करण्यात आली असून त्यांना मंत्रालयात येण्या-जाण्यासाठी एस.टी. आणि बेस्टच्या विशेष बस सुविधा देण्याचा निर्णय या अधिसूचनेद्वारे घेण्यात आला आहे. 

अधिक वाचा : व्यावसायिक आणि खासगी आस्थापना सुरू ठेवण्यास परवानगी

जनतेच्या अडचणी जाणून २० एप्रिलपासून काही सेवांना लॉकडाऊनमधून सूट देण्यात आल्या आहेत त्या खालील प्रमाणे 

• कोविड 19 चा प्रादुर्भाव वाढलेल्या भागात केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या निकषानुसार हॉटस्पॉट घोषित करणार 

• या क्षेत्रात मार्गदर्शक सूचनांनुसार मुंबई, नागपूर, पुणे, पिंपरी चिंचवड या महापालिका व इतर ठिकाणी जिल्हा प्रशासन कंटेन्टमेंट झोन घोषित करतील

• रुग्णालये, संशोधन केंद्रे, प्रयोगशाळा, औषध दुकाने व वैद्यकीय साहित्य उत्पादन व विक्री केंद्रे सुरू राहतील

• कृषी विषयक कामे तसेच कृषी व बागायती कामांसाठी लागणारी साहित्य विक्री व उत्पादन, कृषी माल खरेदी केंद्रे, कृषी माल खरेदी विक्री केंद्रे, मार्केट यार्ड, मासेमारी क्षेत्र

• सागरी व स्थानिक मासेमारी, मत्स्य उत्पादनाशी संबंधित व्यवसाय

• चहा, कॉफी, रबर, बांबू, नारळ, सुपारी, काजू आणि मसाले यांच्या वृक्षारोपणाची कामे. तसेच यांच्यावरील प्रक्रिया, पॅकेजिंग, विक्री आणि मार्केटिंगची कामे जास्तीत जास्त 50 टक्के मजुरांसह

• दूध प्रक्रिया केंद्रांकडून केले जाणारे दुध आणि दुग्धजन्य पदार्थांचे संकलन, प्रक्रिया, वितरण, विक्री आणि त्यांची वाहतूक

• पोल्ट्री फार्म, हॅचरीज

• पशुखाद्य निर्मिती प्रकल्प तसेच मका, सोया यासारख्या कच्च्या मालाचा पुरवठा 

• गोशाळा, प्राण्यांचे शेल्टर होम यांचे कार्यान्वयन 

• वने आणि वनेतर क्षेत्रातील तेंदुपत्ता संकलन, प्रक्रिया, वाहतूक आणि विक्री

• भारतीय रिझर्व्ह बँक आणि त्यांच्यामार्फत नियंत्रित केले जाणारे एनपीसीआय, सीसीआयएल सारख्या वित्तीय संस्था, पेमेंट सिस्टीम ऑपरेटर्स, एनबीएफसी, एचएफसी या कमीत कमी कर्मचार्‍यांसह

• बँक शाखा आणि एटीएम, बँक व्यवहारासाठी आवश्यक असलेले आयटी पुरवठादार, बँकिंग करस्पॉडंटस्, एटीएम ऑपरेशन आणि कॅश मॅनेजमेंट एजन्सीज. 

• सेबी, आयआरडीएआय आणि इन्शुरन्स कंपनीज

• सहकारी पतसंस्था 

• बालके, दिव्यांग, गतिमंद, ज्येष्ठ नागरीक, निराधार, महिला, विधवा यांची निवासीगृहे 

• अल्पवयीन मुलांची निरीक्षण गृहे, संरक्षण गृहे

• ज्येष्ठ नागरिक, विधवा, स्वातंत्र्य सैनिक यांच्या निवृत्त योजनांमधील निधीचे वाटप, तसेच निवृत्तीवेतन आणि प्रॉव्हिडंट विषयक सेवा

• बालके, स्तनदा माता यांना पोषण आहाराचा घरपोच पुरवठा केला जाईल. लाभार्थी अंगणवाडीत येणार नाहीत.

• सर्व शैक्षणिक, प्रशिक्षण संस्था, कोचिंग संस्था बंद राहतील. तथापि, या संस्थांनी आपले शैक्षणिक कामकाज ऑनलाईन प्रणालिद्वारे चालू ठेवणे अपेक्षित.

• दूरदर्शन आणि विविध शिक्षणविषयक वाहिन्यांचा वापर करता येऊ शकेल

• सोशल डिस्टंन्सिगच्या नियमांचे पालन करुन तसेच मजुरांनी चेहर्‍यावर मास्कचा वापर करुन मनरेगाची कामे

• सिंचन आणि जलसंधारणाच्या कामांना मनरेगामधून प्राधान्य

• पेट्रोल, डिझेल, केरोसीन, सीएनजी, एलपीजी, पीएनजी या इंधन आणि गॅस क्षेत्रातील कामे 

• वीजेची निर्मिती, पारेषण आणि वितरण

• पोस्टल सेवा 

• महापालिकांसह विविध स्थानिक स्वराज्य संस्थांमधील पाणीपुरवठा, स्वच्छता आणि कचरा व्यवस्थापनाचे कामकाज 

• दूरध्वनी आणि इंटरनेट सेवा पुरवठ्याचे कामकाज

• दुष्काळ, टंचाई यांच्या निवारणासाठीची सर्व कामे. टँकरने पाणीपुरवठा, वाहनांमधून पशुखाद्य पुरवठा 

• राज्यांतर्गत आणि आंतरराज्य वस्तू आणि मालाची ने-आण करण्यास परवानगी

• सर्व वस्तू मालाची ने- आण

• वस्तू,माल,पार्सल यांची ने-आण करण्यासाठी रेल्वेचा वापर

• विमानतळाचे परिचालन आणि कार्गोवाहतूककीसाठी मदत/संकट काळासाठी आवश्यक असणार्‍या सुविधा

• कार्गो वाहतुकीसाठी बंदरे, इनलँडकंटेनर डेपो यांची सुविधा,ज्यात कस्टम्स क्लिअरिंग आदींचा समावेश.

• माल,वस्तू,पेट्रोलियम पदार्थ, गॅस सिलेंडर, जेवणाचे पाकिटे,औषधेयांची ने-आण करण्यासाठी परवानगी. यामध्ये आवश्यक असल्यास सीमा पार करण्याची परवानगी.

• वस्तू,माल घेऊन जाणारे ट्रक तसेच इतर वाहने यांना दोन चालक,एक मदतनीस यांच्यासह प्रवास करण्यास परवानगी

• वाहन चालविणार्‍याकडे वैध वाहन परवाना आवश्यक. माल/वस्तू यांची पोहोच केल्यानंतर रिकामा ट्रक/वाहन परत घेऊन जाण्यास परवानगी.

• ट्रक दुरुस्तीची दुकाने, महामार्गावरील धाबे सुरु करण्यास परवानगी; मात्र केंद्र आणि राज्य शासनाने सोशल डिस्टन्सिंगचे घालून दिलेले नियम पाळणे आवश्यक.

• रेल्वे,विमानतळ,बंदरे,जेट्टी इत्यादी ठिकाणी कामावर जाणार्‍या अधिकारी/कर्मचार, कंत्राटी कामगार याना जाण्यास परवानगी. या कर्मचार्‍यांकडे त्यांच्या संस्थेने दिलेले अधिकृतपत्र असणे आवश्यक.

 • नागरिकांनी घराबाहेर पडू नये यासाठी जिल्हाधिकार्‍यांनी घरपोच सुविधा सारख्या उपाययोजनांना प्रोत्साहन द्यावे.