मुंबई : पुढारी ऑनलाईन
जागतिक स्तरावर सोन्याची मागणीत आलेली तेजी आणि डॉलरच्या तुलनेत रुपया कमजोर झाल्याने बुधवारी मुंबईत रिटेल मार्केटमध्ये सोन्याचा दर प्रति १० ग्रॅम मागे ५० हजार पार झाला. देशात सोन्याचा दराने पुन्हा एकदा उच्चांकी गाठली आहे. परदेशी बाजाराच्या तुलनेत स्थानिक बाजारात सोन्या-चांदीचा दर तेजीत आहे.
एका वृत्ताने दिलेल्या माहितीनुसार, २०१८ सालापासून सोन्याच्या किंमती वाढत चालल्या आहेत. याआधी सोन्याचा दर ३० ते ३२ हजारांवर होता. तर गेल्या २ वर्षात सोन्याच्या किंमतीत ५७ टक्के वाढ झाली आहे. तर सध्या सोन्याचा दर ५० हजारांच्या घरात पोहोचला आहे. यामुळे सोन्याच्या दराने पहिल्यादाच सर्वात मोठी उसळी मारली.
वाचा : चिंताजनक! अमेरिकेत कोरोनाचे थैमान; एका दिवसात तब्बल ५२ हजार रुग्ण
न्यूयॉर्कमध्ये मंगळवारी रात्री सोन्याच्या किंमतीने ८ वर्षाच्या तुलनेत उच्चांकी गाठली. तेथे सोन्याची किमंत १८०० डॉलरहून अधिक होती. यामुळेच देशात बुधवारी सोन्याच्या किंमतीत वाढ झाली.
कोरोना विषाणूमुळे जागतिक अर्थकारणात खळबळ उडाली आहे. सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोन्याची प्रचंड प्रमाणावर खरेदी होत आहे. यामुळे सोन्याचे दर 50 हजार रुपये प्रति तोळ्यावर जातील, असा अंदाज याआधीच सराफा बाजारातील तज्ज्ञांनी व्यक्त केला होता.
वाचा : 'या' सुरक्षा रक्षकाने स्वत: पावसात भिजत श्वानावर धरले छत्र