Wed, Aug 12, 2020 20:57होमपेज › Mumbai-Thane-Raigad › एका चुटकीत 'या' अ‍ॅपमधून करा 'पीएफ'ची कामे!

एका चुटकीत 'या' अ‍ॅपमधून करा 'पीएफ'ची कामे!

Last Updated: Jan 15 2020 3:20PM
स्मार्टफोनमध्ये झालेल्या क्रांतीमुळे माहिती मिळवण्याची प्रक्रिया अत्यंत वेगवान झाली आहे. किंबहुना बसल्या जागी अनेक गोष्टी साध्य करण्याची किमया स्मार्टफोनमधील तंत्रज्ञानाने केली आहे. त्यामुळे स्मार्टफोनने लोकांना अधिक स्मार्ट केले आहे असे म्हणावे लागेल. अनेक क्षेत्रातील अनेक घटकांची माहिती तसेच केंद्र आणि राज्य सरकारच्या कल्याणकारी योजनांची माहिती आपल्याला आता घरबसल्या घेणं शक्य आहे.

सरकारने अशा एका ॲपची निर्मिती केली आहे. त्याचे ॲपचे नाव ईपीएफओ उमंग ॲप (EPFO UMANG App) असे आहे. आपल्याला पीएफ खात्याचा तपशील जाणून घ्यायचा असेल तर तुम्ही या ॲपच्या माध्यमातून पाहू शकता. भारत सरकारच्या उमंग अ‍ॅपवर (Unified Mobile Application for New-age Governance) आपल्याला ही सुविधा मिळेल. या अ‍ॅपवर आपल्याला बर्‍याच सरकारी सेवा ऑनलाईन मिळतात. यामध्ये ईपीएफओ सेवेचाही समावेश आहे.

यामध्ये कर्मचारी त्यांचे पासबुक तपासू शकतात, खात्याचा तपशील घेऊ शकतात. इतर अनेक सुविधा देखील उपलब्ध आहेत. यासाठी आपल्याला उमंग ॲप डाउनलोड करावं लागेल. Android यूझर्स Google Play Store वर जाऊ शकतात. आयफोन यूझर्स ॲपल अ‍ॅप स्टोअरवरून डाउनलोड करू शकतात.

UAN कार्यान्वित करण्याची सुविधा

उमंग अ‍ॅपद्वारे कोणताही कर्मचारी स्मार्टफोनवर त्यांचे पासबुक पाहू शकतो. याशिवाय पीएफ क्लेमही करू शकतो, पीएफ क्लेम ट्रॅक करू शकतो. हे अ‍ॅप वापरुन एखादा कर्मचारी त्यांचा युनिव्हर्सल अकाउंट नंबर (यूएएन) अ‍ॅक्टीव्हेट करू शकतो.

या अ‍ॅपद्वारे आपण आपल्या जवळच्या ईपीएफओ कार्यालयाचा पत्ता शोधू शकता. आपण आपल्या खात्याचा तपशील जाणून घेऊ इच्छित असल्यास अ‍ॅपच्या माध्यमातून एसएमएस करू शकता. याशिवाय अ‍ॅपवर आपण मिस कॉलद्वारे अकाउंट डिटेल्स देखील घेऊ शकता.

ईपीएफओ पेन्शनधारकांसाठी सुद्धा अ‍ॅप सुविधा प्रदान करते. पेन्शनधारक उमंग अ‍ॅपवर त्यांचे पासबुक पाहू शकतात. आपण या अॅपवर आपला लाइफ प्रूफ अपडेट करू शकतात. 

या अ‍ॅपद्वारे ग्राहकांना ई-केवायसीची सुविधा देखील मिळते. आपण आपल्या अ‍ॅपवरच आपल्या खात्याची माहिती पीएफ खात्याशी लिंक  करू शकता. अशा प्रकारे घरी बसून आपली केवायसी प्रक्रिया पूर्ण केली जाऊ शकते. उमंग अ‍ॅपमध्ये कर्मचार्‍यांसाठी सुविधासुद्धा आहेत. अ‍ॅपवर कर्मचारी आपला तात्पुरता परतावा संदर्भ क्रमांक (टीआरआरएन) ची माहिती घेऊ शकतात. अशा बऱ्याच शासकीय सेवेचा लाभ आपण एका अ‍ॅपच्या माध्यमातून घेऊ शकतो. त्यामुळे हे अ‍ॅप लगेच डाऊनलोड करून शासकीय योजनांचा लाभ घ्यायला हरकत नाही.