Sat, Oct 24, 2020 22:59होमपेज › Mumbai-Thane-Raigad › 'बेबो'चे ४० व्या वर्षात पदार्पण, बॉलिवूडमध्ये २० वर्षे पूर्ण

'बेबो'चे ४० व्या वर्षात पदार्पण, बॉलिवूडमध्ये २० वर्षे पूर्ण

Last Updated: Sep 21 2020 11:14AM
वाढदिवस - करीना कपूर खान

मुंबई : पुढारी ऑनलाईन 

चित्रपट 'रिफ्यूजी'मधून बॉलिवूडमध्ये डेब्यू करणाऱ्या करीना कपूर खानचा आज ४० वा वाढदिवस आहे. बेबो अर्थातच करीना कपूरचा हा वाढदिवस खूपच खास आहे. करीना कपूर वाढदिवसाआधी भावूक झाली आहे. तिने एक पोस्ट लिहून आपले आयुष्य आणि बॉलिवूड करिअरविषयी खास अनुभव शेअर केले आहेत. 

करीना कपूरची खास पोस्ट

करीना कपूरने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर ब्लॅक ॲण्ड व्हाईट फोटो पोस्ट केले आहे. फोटोमध्ये करीना कपूर खान हसताना दिसत आहेत. त्याचबरोबर, करीनाने ४० व्या वाढदिवसाच्या औचित्याने खूपच खास पोस्ट लिहिली आहे. करीनाने लिहिले आहे 'जशी मी ४० व्या वर्षात पदार्पण करत आहे, मला पुन्हा सर्व आठवायचे आहे, मी समजू इच्छिते. प्रेम करणे, हसणे, विसरणे, माफ करू इच्छिते. मला शक्ती देण्यासाठी आभार, ज्यांनी मला दृढ बनवलं.'

सोशल मीडियावर पोस्ट व्हायरल

करीना पोस्टमध्ये पुढे लिहिते की 'धन्यवाद माझे अनुभव आणि निर्णयासाठी ज्यांनी मला स्त्री बनवलं. मी कधी योग्य, कधी चुकीचे, कधी ग्रेट राहिले आहे. हाय, बिग ४०, यापेक्षा मोठं असणे.' 

बॉलिवूडमध्ये 'बेबो'ची २० वर्षे पूर्ण 

खरंतरं, करीना कपूर खानचा ४० वा वाढदिवस अनेक गोष्टींसाठी खास आहे. 'रिफ्यूजी' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये एंट्री करणाऱ्या कंगनाने यावर्षी 'अंग्रेजी मीडियम'मध्ये काम केलं होतं. त्याचबरोबर करीनाने बॉलिवूडमध्ये २० वर्षे पूर्ण केले आहेत. आपल्या करिअरमध्ये करीना कपूर खानने प्रत्येक प्रकारच्या चित्रपटात काम केले आहे. 'जब वुई मेट', '३ इडियट्स', 'बजरंगी भाईजान', 'युवा', 'चमेली', 'ओमकारा', 'तलाश' यासारख्या चित्रपटांमध्ये तिच्या दमदार अभिनयाचे खूप कौतुक झाले आहे. 'कभी खुशी कभी गम' चित्रपटातील करीनाचा डायलॉग आहे-'कौन है जिसने मुडकर पू को नहीं देखा'. आजदेखील फॅन्सना चांगले लक्षात आहे. 

दुसऱ्यांदा आई बनणार करीना

करीना आणि सैफ अली खानच्या घरी पाळणा हलणार आहे. नव्या पाहुण्याचे आगमन होणार असल्याची पुष्टीदेखील खान कुटुंबीयांकडून करण्यात आली आहे. सैफ आणि करीनाने म्हटले होते की, ‘आम्हाला ही घोषणा करताना आनंद होत आहे की, आम्ही आमच्या घरात एक नवा पाहुणा येण्याची अपेक्षा करत आहोत. सर्व शुभचिंतकांचे आमच्यासाठीचे प्रेम आणि आम्हाला समर्थन देण्यासाठी धन्यवाद.’

video, photo - kareenakapoorkhankareena_kapoors_world_fc insta वरून साभार 

View this post on Instagram

#throwbackthursday ❤ @kareenakapoorkhan

A post shared by kareena kapoor khan fan club (@kareena_kapoors_world_fc) on

 "