Thu, Aug 06, 2020 03:58होमपेज › Mumbai-Thane-Raigad › आनंद वार्ता : देशात पहिल्यांदाच २४ तासात ५० हजार रुग्ण झाले कोरोनामुक्त

आनंद वार्ता : देशात पहिल्यांदाच २४ तासात ५० हजार रुग्ण झाले कोरोनामुक्त

Last Updated: Aug 03 2020 1:33AM

संग्रहीत छायाचित्रनवी दिल्ली : पुढारी ऑनलाईन

गेल्या काही दिवसांपासून भारतात प्रतिदिनी ५० हजाराच्या वर कोरोना रुग्ण आढळून येत आहेत. कोरोनाचा हा वाढता आलेख देशाची चिंता वाढवणारा ठरत आहे. परंतु आज मिळालेल्या आकडेवारीनुसार मागच्या २४ तासात ५४ हजार ७३६ नवे कोरोना रुग्ण आढळून आले असले तरी गेल्या २४ तासातच ५० हजार रुग्ण बरे होऊन घरी गेले आहे. देशात २४ तासात ५० तब्बल हजार कोरोना रुग्ण बरे होण्याची ही पहिलीच घटना आहे. 

गेल्या २४ तासात देशात कोरोनामुळे मृत्यूमुखी पडणाऱ्यांची संख्या ८५३ इतकी आहे.  दरम्यान, भारताने १७  लाखांचा कोरोना रुग्णांचा टप्पा ओलांडला आहे. देशातील एकूण कोरोना बाधितांची संख्या १७ लाख ५० हजार ७२७ वर गेली आहे.  तर देशातील ११ लाख ४५ हजार ६३० रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे असे  आरोग्य मंत्रालयाकडून सांगण्यात आले आहे.  

महाराष्ट्र राज्यात कोरोना रुग्णांचा आकडा ४ लाख ३१ हजार ७१९ वर गेला आहे. तर २ लाख ४० हजार रुग्णांचे बरे झाले आहेत. राज्यात सध्या १ लाख ४९ हजार २१४ कोरोना रुग्ण उपचार घेत आहे. तामिळनाडूत २ लाख ३४ हजार रुग्ण सापडले आहेत यातील १ लाख ७३ हजार रुग्ण बरे झाले आहेत तर ५७ हजार रुग्ण उपचार घेत आहेत. राजधानी दिल्लीत १ लाख ३३ हजार रुग्ण सापडले आहेत यातील १० हजार रुग्ण उपचार घेत आहेत. 

देशात सर्वात जास्त रुग्ण बरे होण्याचे प्रमाण राजधानी दिल्लीत आहे. ९० टक्के रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. या खालोखाल हरियाणामध्ये ७९ टक्के, आसाम ७६ टक्के, तेलंगणा ७४ टक्के, तामिळनाडू ७४ टक्के, गुजरात ७३ टक्के, राजस्थान ७१ टक्के, अरुणाचल प्रदेश ४६ टक्के, आंध्रप्रदेश ४६ टक्के, झारखंड ४१ टक्के, नागालँड ३९ टक्के, कर्नाटक ३८ टक्के, सिक्कीम ३३ टक्के, आणि मेघालय २५ टक्के याप्रमाने देशातील सरासरी ५० टक्क्यापेक्षा जास्त रुग्ण बरे होण्याचे प्रमाण असल्याचे समोर आले आहे.