Fri, Sep 18, 2020 21:39होमपेज › Mumbai-Thane-Raigad › देशात कोरोनाग्रस्तांची संख्या ५० लाख पार; फक्त ११ दिवसात १० लाख वाढले! 

देशात कोरोनाग्रस्तांची संख्या ५० लाख पार

Last Updated: Sep 16 2020 8:19AM
नवी दिल्ली : पुढारी ऑनलाईन

भारतातील कोरोना केसेसमध्ये विक्रमी वेगाने वाढ होत चालली आहे. मंगळवारी देशात कोरोना रूग्णांची संख्या ५० लाखांवर गेली. गेल्या फक्त ११ दिवसात तब्बल १० लाख लोक बाधित झाले आहेत. गेल्या दोन महिन्यात ४० लाख प्रकरणे समोर आली आहेत. देशात ॲक्टिव्ह  केसेस १० लाखांवर गेल्या आहेत. या प्राणघातक आजाराने आतापर्यंत ८० हजाराहून अधिक लोकांचा बळी घेतला आहे.

देशात कोरोना रूग्ण वाढीवर नजर टाकल्यास गेल्या दोन महिन्यांपासून अत्यंत भयानक परिस्थिती निर्माण झाली आहे. देशात १ ते १० लाख प्रकरणे होण्यास १६७  प्रकरणे लागली होती. १० ते २० लाख प्रकरणे केवळ २१ दिवसांत, २० ते ३० लाख प्रकरणे १६ दिवसात ३० ते ४० लाख प्रकरणे १३ दिवसात, तर ४० ते ५० लाख प्रकरणे ११ दिवसांत  झाली आहेत. कोरोना प्रकरणात भारत दुसर्‍या क्रमांकावर आहे. अमेरिका प्रथम आणि ब्राझील तिसऱ्या क्रमांकावर आहे.

कोरोना महामारीने देश हादरवून टाकला आहे. दररोज मोठ्या संख्येने नवीन रुग्ण येत आहेत. दिल्ली, आंध्र प्रदेश, महाराष्ट्र, कर्नाटक आणि उत्तर प्रदेश यासारख्या राज्यांमध्ये या आजाराने बाधित लोकांची संख्या दररोज वाढत आहे. 

 "