Thu, Aug 06, 2020 04:05होमपेज › Mumbai-Thane-Raigad › राज्यात १ लाख जणांची कोरोनावर मात; आज ८ हजारहून अधिक घरी सुखरुप परतले!

राज्यात १ लाख जणांची कोरोनावर मात; आज ८ हजारहून अधिक घरी सुखरुप परतले!

Last Updated: Jul 02 2020 9:29PM

संग्रहित छायाचित्रमुंबई : पुढारी ऑनलाईन

राज्यात आज (ता. ०२) ६ हजार ३३० कोरोनाबाधित रुग्णांची  वाढ झाली आहे. दिलासादायक म्हणजे आज नवीन ८ हजार १८ जण बरे होऊन घरी परतले आहेत. त्यामुळे आजवर राज्यात १ लाख १ हजार १७२ जणांनी कोरोनावर मात केली आहे. राज्यात सध्या ७७ हजार २६० ॲक्टिव्ह केसेस आहेत. आज कोरोनावर मात केलेल्यांमध्ये सर्वांधिक मुंबई मंडळातील आहेत.