धनंजय मुंडेंचे प्रकरण गंभीर असल्याचे शरद पवार सांगतात तर मुंडेचा राजीनामा घ्या : प्रविण दरेकर

Last Updated: Jan 14 2021 3:28PM

विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकरमुंबई : पुढारी ऑनलाईन

धनंजय मुंडे यांच्यावर झालेल्या आरोपांवर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (ncp leader sharad pawar)  यांनी हे प्रकरण गंभीर असल्याचे सांगीतले. यावर विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर (mlc opposition leader pravin darekar) यांनी वक्तव्य केले आहे. दरेकर म्हणाले की धनंजय मुंडे यांच्यावरील आरोपांबाबत शरद पवार यांनीही हे प्रकरण गंभीर असल्याचे सांगीतले आहे, तर मंत्री मुंडे यांनी तात्काळ राजीनामा देणे अपेक्षित आहे. (if sharad pawar clarifies his role then dhananjay munde should resign immediately says pravin darekar) असे मत विधानपरिषदेचे विरोधीपक्ष नेते प्रविण दरेकर यांनी व्यक्त केले आहे. माझ्यासह भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि देवेंद्र फडणवीस यांची एकत्रित भूमिका असल्याचेही दरेकर यांनी सांगीतले.

अधिक वाचा : धनंजय मुंडेंवर कारवाईचे शरद पवारांचे संकेत, मुंडेंच्या भूमिकेकडे लक्ष 

याचबरोबर दरेकर म्हणाले की, मुंडेंच्या प्रकरणावर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची पहिली भूमिका चाचपडणारी होती. परंतू शरद पवार यांनीही हे प्रकरण गंभीर असल्याचे सांगीतले आहे. त्यामुळे जर हे प्रकरण गंभीर असेल आणि संबंधित महिलेने मोठे आरोप केले आहेत तर त्याची सिद्धता होईलच. राजकारणात शेवटी नितीमुल्य आणि नैतिकतेला फार महत्व असल्याचे दरेकर यांनी सांगीतले.

अधिक वाचा : मुंडेंवरील आरोप गंभीर, पक्ष म्हणून तातडीने निर्णय घ्यावा लागेल : शरद पवार 

जेव्हा जेव्हा राज्यात अशा घटना घडल्या किंवा प्रसंग आले त्या त्या वेळी संबंधीत मंत्र्याकडून राजीनामा घेतल्याची अनेक उदाहरण आहेत. शिवशाही सरकार असतानाही काही मंत्र्यांवर आरोप झाले होते तेव्हा बाळासाहेब ठाकरेंनी त्यांचे राजीनामे घेतले होते. म्हणून त्याचं बाळासाहेबांचे सुपुत्र जे या राज्याचे मुख्यमंत्री आहेत त्यांनी याबाबत निर्णय घेतला पाहिजे कारण आता शरद पवारांचीही भूमिका स्पष्ट झाली आहे, असंही दरेकर यांनी म्हटले.