Sat, Oct 24, 2020 22:48होमपेज › Mumbai-Thane-Raigad › 'गुप्तेश्वर पांडे बिहारचे DGP होते, पण ते भाजप नेते असल्यासारखे बोलायचे'

'गुप्तेश्वर पांडे बिहारचे DGP होते, पण ते भाजप नेते असल्यासारखे बोलायचे'

Last Updated: Sep 25 2020 8:39AM

गृहमंत्री अनिल देखमुखमुंबई : पुढारी ऑनलाईन

सुशांत सिंह राजपूत प्रकरणात वादग्रस्त वक्तव्यांनी चर्चेत आलेल्या बिहारचे माजी पोलिस महासंचालक गुप्तेश्वर पांडे यांच्यावर महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देखमुख यांनी टिका केली आहे. गुप्तेश्वर पांडे बिहारचे DGP होते, पण ते भाजप नेते असल्यासारखे बोलायचे, असे गृहमंत्री अनिल देखमुख यांनी म्हटले आहे. ते पत्रकार परिषदेत बोलत होते. अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणात वादगस्त वक्तव्यावरुन चर्चेत आलेले बिहारचे पोलिस महासंचालक गुप्तेश्वर पांडे यांनी स्वेच्छानिवृत्ती घेतली आहे. विशेष म्हणजे बिहार विधानसभा निवडणुकीदरम्यानचं त्यांनी पोलिस सेवेतून निवृत्ती घेतली आहे. ते निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याची चर्चा सुरु आहे. 

वाचा :अभिनेत्री दीपिका पदुकोण उद्या ‘एनसीबी’समोर हजर

पुढे बोलताना गृहमंत्री अनिल देशमुख म्हणाले, गुप्तेश्वर पांडे वरिष्ठ अधिकारी होते. पण ते भाजपचे वरिष्ठ नेता असल्यासारखे मागील काही दिवसांपासून बोलायचे. त्यांच्या बोलण्यातून तसं जाणवायच. ते ज्या प्रकारे ते बोलायचे, ज्या प्रकारची त्यांची वक्तव्ये असायची त्यावरून तरी ते भाजप नेते आहेत असे वाटायचे. राजीनामा दिल्यानंतर आता ते भाजपच्या तिकीटावर विधानसभा निवडणूक लढवणार असल्याच्या चर्चा आहेत. यावरूनच त्यांच्या पाठीमागच्या एकंदरित वक्तव्यांचा अंदाज येतो, असेही गृहमंत्री अनिल देशमुख म्हणाले. 

वाचा : ‘कोलकाता नाईट रायडर्स’च्या पार्टीत ड्रग्जची लयलूट 

 "