नवी दिल्ली : पुढारी वृत्तसेवा
कोरोना रूग्णसंख्येत वाढ होत असली तरी देशात केवळ ४.७४ टक्के सक्रिय रूग्ण असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. गेल्या एका दिवसात ३८ हजार ७७२ रूग्णांची (new #COVID19 infections) भर पडल्याने एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या (India's total corona cases rise) ९४ लाख ३१ हजार ६९१ वर पोहोचली आहे. यातील ८८ लाख ४७ हजार ६०० रूग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तर, ४ लाख ४६ हजार ९५२ रूग्णांवर उपचार सुरु आहेत. रविवारी दिवसभरात ४४३ रूग्णांचा कोरोनाने बळी घेतल्याने एकूण मृतांचा आकडा १ लाख ३७ हजार १३९ एवढा (१.४५ %) नोंदवण्यात आला आहे. गेल्या एका दिवसात ४५ हजार ३३३ रूग्णांनी कोरोनावर मात मिळवल्याने सक्रिय कोरोनाबाधितांच्या संख्येत ७ हजारांची घट नोंदवण्यात आली आहे.
वाचा : लष्कर आणि रॉ प्रमुख नेपाळमध्ये, अजित डोभाल श्रीलंकेत! रणनीती आहे तरी काय?
सोमवारी देशाचा कोरोनामुक्तीदर ९३.८१ टक्के नोंदवला गेला. केंद्रीय आरोग्य मंत्रालयानुसार गेल्या एका दिवसात केरळमध्ये सर्वाधिक ५ हजार ६४३ कोरोनारूग्ण आढळले. केरळ पाठोपाठ महाराष्ट्र ( ५,५४४), दिल्ली (४,९०६), प. बंगाल (३,३६७), राजस्थान (२,५८१), तसेच उत्तर प्रदेशामध्ये (१,९७४) कोरोनाबाधित आढळले. गेल्या एका दिवसात झालेल्या कोरोनामृत्यूपैकी ७९ टक्के मृत्यू हे १० राज्य, केंद्रशासित प्रदेशांमध्ये झाले.
वाचा : airtel कडून ११ जीबी डेटा फ्री; 'असा' घ्या लाभ!
महाराष्ट्रात सर्वाधिक ८५ रूग्ण दगावले. महाराष्ट्रासह दिल्ली (६८), प.बंगाल (५४), केरळ (२७), हरियाणा (२६), तसेच उत्तर प्रदेशात (२४) कोरोनामृत्यूचे प्रमाण जास्त होते. गेल्या आठ दिवसात ४ हजार ४५ रूग्णांचा कोरोनाने बळी घेतला. देशात आतापर्यंत १४ कोटी ३ लाख ७९ हजार ९७६ कोरोना तपासण्या करण्यात आल्या आहेत. यातील ८ लाख ७६ हजार १७३ कोरोना तपासण्या या रविवारी करण्यात आल्याची माहिती आयसीएमआरकडून देण्यात आली आहे.